मुंबई – झोमॅटो हे खूप प्रसिद्ध फूड डीलिव्हरी प्लॅटफॉर्म आहे. यांच्या विविध फूड डीलिव्हरी सेवेचे प्रकार आहेत. ज्यामध्ये तुम्ही कोणत्याही भागातून तुमच्या आवडीचे जेवण किंवा कोणतेही फूड मागवू शकता. तसेच तुम्हाला यावरुन फूड ऑर्डर केल्यावर खूप साऱ्या ऑफर्सचा लाभ देखील घेता येतो.
खरंतर झोमॅटो आता किराणा डीलिव्हरी सेवेतून बाहेर पडले आहे. त्यामुळे तुम्हाला झोमॅटोच्या अॅपवर किराणा डीलिव्हरी सेवा मिळणार नाही.ऑर्डर पूर्ण करण्यात त्यांना खूप वेळ लागत आहे, तसेच ग्राहकांचा कमकुवत प्रतिसाद आणि प्रतिस्पर्ध्यांसोबतची वाढती स्पर्धा पाहाता कंपनीने हा निर्णय घेतला असल्याचे सांगितले.
आम्ही आमचे ग्रोसरी पायलट बंद करण्याचा निर्णय घेतला आहे आणि सध्या आमच्या प्लॅटफॉर्मवर इतर कोणत्याही प्रकारचा किराणा डीलिव्हरी सेवा चालवण्याची योजना नाही. असे झोमॅटोच्या प्रवक्त्याने सांगितले
17 सप्टेंबरपासून पायलट किराणा डीलिव्हरी सेवा बंद
झोमॅटोने 11 सप्टेंबर 2021 रोजी त्याच्या ग्रॉसरी पार्टनर्सना पाठविलेल्या मेलमध्ये असे म्हटले आहे की, त्यांनी 17 सप्टेंबरपासून पायलट किराणा डीलिव्हरी सेवा बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. कंपनीने निवडक बाजारांमध्ये किराणा सेवा पायलट सुरू केली होती. याअंतर्गत, ग्राहकांना 45 मिनिटांच्या आत किराणा वितरण देण्यात येत होते.
: