सोशल मीडियावर अनेक भावनिक असे व्हिडिओ व्हायरल होत असतात. असाच झोमॅटो डिलिव्हरी एजंटचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यात एक बाप कर्तव्यासह आपली जबाबदारीही चोखपणे पार पाडताना दिसत आहे. या व्यक्तीचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.
व्हायरल व्हिडीओत झोमॅटो डिलिव्हरी एजंट आपल्या दोन मुलांसह ऑर्डर वितरित करण्य़ासाठी ग्राहकाच्या दारात उभा असल्याचे दिसते. त्यावेळी त्याच्या कुशीत आपली चिमुकली लेकही दिसते. तर आणखी एक मुलगा त्याच्यासोबत असल्याचे दिसते. हा व्हिडीओ शेअर करत एका फूड व्लॉगरने कॅप्शनमध्ये लिहिले की, “हे पाहून मला खूप प्रेरणा मिळाली. Zomato डिलिव्हरी पार्टनर त्याच्या दोन मुलांसह संपूर्ण दिवस उन्हात घालवतो. माणसाने ठरवलं तर तो काहीही करू शकतो हे आपण शिकले पाहिजे” असं म्हटलं आहे.
हा व्हिडीओ पहिल्यानंतर एका नेटकऱ्याने कमेंट करत लिहिले की, ‘हे आहे वडिलांचे प्रेम’ तर आणखी एका नेटकऱ्याने लिहिले की, ‘वडिलांचे प्रेम दाखवावे लागत नाही.’ तर आणखी एका यूजरने लिहिले की, “हे खूप प्रेरणादायी आहे. परिस्थिती कशीही असो, आपण कठोर परिश्रम केले पाहिजे.” आणखी एका युजरने बाप हाच खरा हिरो असल्याचं म्हटलं आहे.सध्या या झोमॅटो डिलिव्हरी एजंटचे सोशल मीडियावर कौतुक केले जात आहे. तसेच अनेकांनी त्याला मदतीचे आवाहन केले आहे.
View this post on Instagram
व्हिडिओला 1 मिलियनहून अधिक व्ह्यूज ही क्लिप इतकी व्हायरल झाली की झोमॅटोने व्हिडिओवर प्रतिक्रिया दिली आणि त्या माणसाला मदतीचा हात पुढे केला. झोमॅटोने कमेंट बॉक्समध्ये लिहिले, “कृपया ऑर्डरचे तपशील पर्सनल मेसेजमध्ये शेअर करा जेणेकरून आम्ही डिलिव्हरी पार्टनरपर्यंत पोहोचू आणि मदत करू शकू.”