बारामती (प्रतिनिधी) : सावली ही कधीच आपली पाठ सोडत नाही, अस म्हणतात खरं…पण बारामतीला दि.(12) तारखेला दुपारी बरोबर १२:२८ वाजता शून्य सावली होणार असून आपल्याला आपली सावली सुद्धा दिसणार नाही, त्यामुळे आता सावली पण आपली पाठ सोडणार आहे.
सध्या सूर्य उत्तर दिशेला प्रवास करत आहे. म्हणून त्याला उत्तरायण म्हणतात. 21 जून रोजी सर्वात मोठा दिवस असतो. त्यानंतर दक्षिणायन म्हणजे सूर्याचा दक्षिणेकडे परत प्रवास सुरु होतो. ह्या प्रवासादरम्यान सूर्य अक्षांशांवरून पुढे जात असतो. ह्या प्रवासादरम्यान सूर्य ज्या अक्षांशावर असेल त्या गावात दुपारी सूर्य बरोबर डोक्यावर येतो आणि एका क्षणी आपली सावली आपल्याला दिसत नाही. त्या दिवसाला शून्य सावली दिवस किंवा (Zero Shadow Day )म्हणतात.
बारामतीला दि.(12) तारखेला १२:२८ वाजता शून्य सावली होणार आहे. आपल्याला आपलीसुद्धा सावली दिसणार नाही. म्हणजेच आपली सावली सुद्धा त्या क्षणाला आपली पाठ सोडणार आहे.
या दिवशी, या वेळी खालील ठिकाणी सावली गायब होईल
९मे चिपळूण : १२:३२
१०मे सातारा : १२:४१
११मे फलटण : १२:३९
१२ मे बारामती : १२:२८
१३मे पुणे : १२:३१
१४मे अलिबाग : १२:३५