वॉशिंग्टन – अमेरिकेचे अध्यक्ष ज्यो बायडेन यांनी मंगळवारी युक्रेनचे नेते झेलेन्स्की यांना व्हाइट हाऊसमध्ये आमंत्रित केले आहे. रशियाबरोबरच्या युद्धात युक्रेनला आणखी अब्जावधी डॉलरची मदत देण्यासाठी अमेरिकन प्रशासनाने काँग्रेसवर दबाव वाढवला आहे.
ही मदत रोखण्यासाठी रिपब्लिकन संसद ससदस्यांनी मोठी मोर्तेबांधणी केली आहे. त्यामुळे नियोजिक मदतीला कॉंग्रेसची मंजूरी मिळवणे बायडेन यांना कठीण जाऊ लागले आहे. ही मदत मंजूर करणे सुकर व्हावे म्हणूनच बायडेन यांनी झेलेन्सकी यांना व्हाइट हाऊसच्या भेटीचे आमंत्रण दिले आहे.
युक्रेनमधील लोक रशियाच्या क्रूर आक्रमणापासून स्वतःचा बचाव करत असताना त्यांना पाठिंबा देण्यासाठी अमेरिकेची वचनबद्धता अधोरेखित करण्यासाठी या भेटीचा हेतू आहे. असे व्हाइट हाऊसने रविवारी एका निवेदनात म्हटले आहे. झेलेन्सकी यांच्या या भेटीदरम्यान बायडेन प्रशासनाकडून युक्रेनसाठी अधिक मदतीबाबत सविस्तर चर्चा केली जाणे अपेक्षित आहे.
बायडेन यांनी काँग्रेसला युक्रेन ६१.४ अब्ज डॉलर आणि इस्रायलसाठी इतर राष्ट्रीय सुरक्षा प्राधान्यांसह युद्धकाळातील निधीसाठी ११० अब्ज डॉलरच्या पॅकेजची मागणी केली आहे. परंतु ही विनंती यूएस इमिग्रेशन धोरण आणि सीमा सुरक्षा यावरून वादात अडकली आहे.
युक्रेनला तातडीची मदत म्हणून १०६ अब्ज डॉलरचे पॅकेज देण्याच्या प्रस्तावाला रिपब्लिकन संसद सदस्यांनी अटकाव केला आहे.
मात्र युक्रेनला ही मदत केली नाही, तर रशियाचा विजय निश्चित आहे. तसे झाले तर रशिया नाटो सदस्य देशांवरही हल्ला करू शकेल, अशी भीती बायडेन यांनी व्यक्त केली आणि रिपब्लिकन संसद सदस्यांना मंजूरी देण्याचे आवाहन केले. मात्र रशिया नाटो सदस्य देशांवरही हल्ला करण्याची भीती अनाठायी असल्याचे सांगून रिपब्लिकन संसद सदस्यांनी आपली नकारघंटा कायम सुरू ठेवली आहे.