डोर्लेवाडी- बारामती तालुक्यातील डोर्लेवाडी येथे सकाळी नऊ वाजेपर्यंत मतदान करण्यासाठी मतदरांची गर्दी होऊ लागली. दुपारी एक वाजेपर्यंत 35 टक्के मतदान झाले त्यानंतर रांग काहीशी रेंगाळतच चालली होती. सायंकाळी पर्यंत मतदानाची टक्केवारी वाढत गेली.
बारामतीती संवेदनशील मतदान केंद्रापैकी डोर्लेवाडी मतदान केंद्राचा समावेश होतो. त्यामुळे प्रशासनाचे या केंद्रावर बारीक लक्ष होते. नवमतदार तरूणींनी एकत्र येत मतदानाच हक्क बजावला. तर वयाची शंभरी पार केलेले स्वातंत्र्य सैनिक साहेबराव दळवी यांनीही मतदानाच हक्क बजावला. डोर्लेवाडी ग्रामपंचायतीच्यावतीने दिव्यांग मतदारांसाठी विशेष व्यवस्था करण्यात आली होती. अंगणवाडी सेविका, मदतनीस व प्राथमिक आरोग्य केंद्रातील कर्मचाऱ्यांनी मतदना केंद्रावरील व्यवस्था सांभाळली.