पौड (वार्ताहर)- मुळशी धरणाच्या पाणलोट क्षेत्रात सौर उर्जा प्लॅन्ट नं. १ जवळ पोहण्यासाठी उतरलेल्या एकाचा बुडून मृत्यू झाला आहे. प्रथमेश उर्फ शुभम वरघडे (वय २६, रा. आर्यक रेसीडेन्सी एनडीए रोड, शिवणे पुणे ) असे या तरूणाचे नाव आहे. याप्रकरणी धनराज दत्तात्रय चोंधे (रा. भूगाव) यांनी पौड पोलिसांत खबर दिली होती.
सोमवार (दि. ८) सायंकाळी साडेसहा वाजता सागर चहाणे, प्रथमेश उर्फ शुभम वरघडे, विनोद लीमकर, आशुतोश यादव, आपशेक यादव असे पाच जण मुळशी धरण परिसरात फिरण्यासाठी आले होते. त्यावेळी ते मुळशी खुर्द येथील सौर उर्जा प्लॅन्ट नं. १ जवळील धरणातील पाणलोट क्षेत्रात पाण्यात पोहण्यासाठी गेले. प्रथमेश उर्फ शुभम वरघडे हा धरणाचे पाणलोट क्षेत्राचे पाण्यामध्ये पोहत असताना बुडाला.
प्रथमेश याचा पौड पोलस पथक, आपत्ती व्यवस्थापन समिती, पीएमआरडीएचे मारूंजी येथील शोध पथक यांनी रात्र शोध घेतला, परंतु तो मिळून आला नाही तसेच मंगळवारी सकाळी साडेनऊ वाजता त्याचा मृतदेह धरणाच्या पाण्यात मिळून आला. पौड येथील ग्रामीण रूग्णालयात विच्छेदन करून मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला.