अकोले – मातृभाषेतून शिक्षण प्रगतीचे लक्षण,आपली शाळा मराठी शाळा या विशेष प्रचार मोहिमेला अकोले तालुक्यात सुरुवात करण्यात आली. तालुक्यातील आपली शाळा मराठी शाळा या विशेष प्रचार मोहिमेचा प्रारंभ आ. डॉ. किरण लहामटे यांच्या उपस्थितीत झाला. या वेळी गटशिक्षणाधिकारी जालिंदर खताळ, अनिल मोहिते उपस्थित होते.
या मोहिमेत मराठी माध्यमाच्या शाळांमध्ये सुरू असलेल्या शैक्षणिक कामाकाजावर आधारित माहितीपट गावोगावी दाखवला जाणार आहे, तसेच मातृभाषेतून शिक्षण प्रगतीचे लक्षण ही विचार भूमिका असलेली प्रचारपत्रके वाटली जातील. येत्या महिन्याभरात हा रथ अकोले तालुक्यातील सर्व गावांमध्ये फिरणार आहे.
या प्रचार रथाला आमदारांनी हिरवा झेंडा दाखवला आणि या प्रचार मोहिमेचा प्रारंभ झाला. मोहिमेचा भाग म्हणून तालुक्यातील मोठ्या गावांत फलक लावणार असल्याचे जालिंदर खताळ यांनी सांगितले.