बंगळुरू :- इंडियन नॅशनल मोटरसायकल रेसिंग चॅम्पियनशिप स्पर्धेतील चेन्नईतील मद्रास इंटरनॅशनल सर्किटवर झालेल्या रेसिंग चॅम्पियनशिप स्पर्धेत अवघ्या 13 वर्षांच्या श्रेयस हरीश या बाईक रेसरचा अपघाती मृत्यू झाला.
आयोजकांनी तातडीने ही शर्यत थांबवली व त्याला कोपरमला रुग्णालयात दाखल केले मात्र, डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. हा अपघात इतका भीषण होता की त्याच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली होती व प्रचंड रक्तस्रावही झाला होता.
त्याने केवळ 10 दिवसांपूर्वीच आपला 13 वा वाढदिवस साजरा केला होता. अपघातानंतर ही शर्यत पुढे ढकलण्यात आली आहे. शर्यतीत ट्रॅकचे पहिले वळण पार करत असतानाच श्रेयसचे गाडीवरील नियंत्रण सुटले व अपघात घडला. त्यात त्याच्या डोक्याला दुखापत झाली.
कसा घङला अपघात..
ही घटना शनिवारी घडली. श्रेयस हरीशने एमआरएफ मद्रास मोटर स्पोर्ट्स क्लब आणि फेडरेशन ऑफ मोटर स्पोर्ट्स क्लाइव्ह ऑफ इंडियाच्या शर्यतीत भाग घेतला होता. तिसऱ्या फेरीत 200 सीसी मोटरसायकल चालवत असताना त्याची मोटरसायकल घसरली आणि त्याचं हेल्मेट निघालं आणि तो डोक्यावर आपटला. त्याच वेळी श्रेयसच्या मागे येणारा दुसरा रायडर वेळीच थांबू शकला नाही आणि दुर्दैवाने श्रेयसच्या अंगावर गेला.