लोणी काळभोर -भरधाव वेगाने आलेल्या अज्ञात वाहनाने दुचाकीस धडक दिल्याने झालेल्या अपघातात तरूण जागीच मृत्यूमुखी पडला असून त्याचा चुलत भाऊ गंभीर जखमी झाला आहे. हा अपघात सोलापूर – पुणे मार्गावर थेऊर फाटा येथे गुरूवारी (दि. 29) रात्री 10 वाजण्याच्या सुमारास घडला. षीकेश राजेंद्र कांबळे (वय 22) हा मृत्यूमुखी पडला आहे. अक्षय शंकर कांबळे (वय 21, दोघे रा. गायकवाड वस्ती, लोणीकाळभोर) हा गंभीर जखमी झाला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आई – वडील मयत झालेने षिकेश हा एकटाच राहत असून त्याचा भाऊ संदिप राजेंद्र काबळे याचे लग्न झाले आहे. तो त्याचे पत्नीसह वाण्याचा मळा, थेऊर फाटा (ता. हवेली) येथे राहतो. षीकेश जेवणाकरीता संदीप याचेकडे जात होता. रात्री 9 वाजण्याच्या सुमारास ऋषीकेश व अक्षय हे दोघे चुलत भाऊ ऋषीकेश यांचे दुचाकीवरुन संदीप याचेकडे जेवणाकरीता गेले होते. जेवण करून पुन्हा ते दोघे दुचाकी वरुन निघाले. त्यावेळी अपघात झाला.