ट्रॅक्‍टरखाली सापडून तरुणाचा मृत्यू

निमोणे येथील भोर वस्तीमधील घटना

शिरूर (प्रतिनिधी) – निमोणे (ता. शिरूर) येथील भोस वस्तीमध्ये ट्रॅक्‍टरवरून पडून चाक अंगावरून गेल्याने 16 वर्षीय मुलाचा मृत्यू झाला आहे.

याप्रकरणी शिरूर पोलीस स्टेशन येथे एकनाथ नरसिंग हिंगे यांनी खबर दिली आहे. हा अपघात सोमवार (दि.29) सकाळी आठच्यादरम्यान झाला आहे. ऋषिकेश उत्तम हिंगे (वय 16 रा. भोस वस्ती), असे मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव आहे.

सकाळी ऋषिकेश हा चुलते एकनाथ नरसिंग हिंगे यांच्याबरोबर भोस वस्ती येथील माथ्यावरील शेतात गेले होता. शेतात ट्रॅक्‍टरमध्ये कडबा भरल्यानंतर ते पुन्हा घराकडे निघाले असता ट्रॅक्‍टरमागे ऋषिकेश बसला होता.

उतारावर ट्रॅक्‍टर आला असता ट्रॅक्‍टरवरून ऋषिकेश खाली पडला. त्याच्या पोटावरून ट्रॅक्‍टरचे चाक गेल्यान तो गंभीर जखमी झाला होता. त्याला शिरूर येथील श्री गणेशा हॉस्पिटल येथे उपचारासाठी दाखल केले असता उपचारापूर्वी त्याचा मृत्यू झाल्याचे डॉक्‍टरांनी सांगितले. पुढील तपास पोलीस नाईक डी. आर. थेऊरकर करीत आहेत.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.