‘हा’ चित्रपट पाहण्यासाठी तुम्हाला द्यावे लागतील तब्बल 720 तास

मुंबई – लवकरच सिनेरसिकांसाठी एक आगळा वेगळा चित्रपट भेटीला येणार आहे. या चित्रपटाचा नुसता ट्रेलरच 7 तास 20 मिनिटांचा असून, हा जगातील सर्वात लांबीचा चित्रपट असणारा आहे. ‘अ‍ॅम्बियंन्स’ असे या चित्रपटाचे नाव आहे. नुकतंच अ‍ॅम्बियंन्स चित्रपटाचा ऑफिशयल ट्रेलर प्रदर्शित करण्यात आला आहे.

या चित्रपटाचा नुसता ट्रेलर 7 तास 20 मिनिटांचा आहे. तर पूर्ण चित्रपटाची लांबी 720 तास इतकी आहे. आता एवढा मोठा चित्रपट कोण पाहणार हा प्रश्नच आहे. तरीही इतक्या मोठ्या लांबीचा चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर फक्त एकच शो होणार आहे. त्यानंतर चित्रपटाची असलेली एकमेव कॉपी नष्ट केली जाणार आहे.

अ‍ॅम्बियंन्स हा चित्रपट स्वीडिश दिग्दर्शक ‘अँडर्स वेबर्ग’ यांचा शेवटचा चित्रपट असणार आहे. प्रायोगिक चित्रपट म्हणून या चित्रपटाची निर्मिती करण्यात आली आहे. चित्रपटाची कथा दोन कलाकारांच्या संबंधावर आधारित आहे. स्वीडनच्या समुद्राकाठी हे दोघे भेटतात, त्यांचीच ही कथा.

या चित्रपटाचे वैशिष्ट्य म्हणजे सिंगल शॉटमध्ये या चित्रपटाचे शूटींग झाले आहे आणि यात कुठलाही कट नाही. 2014 मध्ये या चित्रपटाचा पहिला टीजर आला असून, तो 72 तासांचा होता. यानंतर 2016 मध्ये याचा पहिला शॉर्ट ट्रेलर लॉन्च झाला होता. तो 7 तास 20 मिनिटांचा होता. गेल्या 4 ते 5 वर्षांपासून चित्रपटाचे शूटिंग सुरू होते. अ‍ॅम्बियंन्स हा चित्रपट  2020 प्रदर्शित होणार आहे. दरम्यान, जगातील सर्वात जास्त लांबीच्या चित्रपटाचा विक्रम स्वीडनमधील एरिका मॅग्नसन आणि डॅनियल अँडरसन यांच्या नावावर आहे.

 

 

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)