नवी दिल्ली – सध्या व्हॉट्सअॅप युजरसाठी अतिशय वाईट बातमी आली आहे? लोकप्रिय मेसेंजिंग अॅप ‘व्हॉट्सअॅप’ कदाचित आपल्या फोनमध्ये काम करू शकणार नाही. त्यामुळे व्हॉट्सअॅप युजरसाठी यापेक्षा वाईट बातमी कोणती असूच शकत नाही.
व्हॉट्सअॅप अँड्रॉईड आणि iOS डिव्हाईससाठी सपोर्ट करणं बंद करणार आहे. काही अँड्रॉईड स्मार्टफोन्स आणि आयफोन्समध्ये आता मेसेजिंग अॅपकडून रेग्युलर अपडेट्स मिळणार नसल्याची माहिती व्हॉट्सअॅपने दिली आहे. iOS 8 आणि त्यापेक्षा जुन्या ऑपरेटिंग सिस्टमवर चालणाऱ्या आयफोन्सवर व्हॉट्सअॅप सपोर्ट करणं बंद होणार आहे.
तसेच अँड्रॉईड 2.3.7 आणि जुन्या ऑपरेटिंग सिस्टमवर चालणाऱ्या अँड्रॉईड स्मार्टफोन्सना देखील व्हॉट्सअॅप अपडेट्स मिळणार नाहीत. या युजर्ससाठी व्हॉट्सअॅप कंपॅटिबिलिटी 1 फेब्रुवारी 2020 नंतर संपणार आहे. तर विंडोज फोनसाठी ही मुदत 31 डिसेंबर 2020 पर्यंत आहे.
No support for iOS 8!
You can still use WhatsApp on iOS 8, but if you reinstall the app, you will no longer able to verify your account.
The iOS 8 compatibility will be fully removed in February 1, 2020.
Windows Phone is confirmed to be deprecated after December 31, 2019. pic.twitter.com/JGRoSBAmMm— WABetaInfo (@WABetaInfo) September 22, 2019