नवी दिल्लीः देशात २०१६ मध्ये नोटबंदी झाली या नोटबंदीमुळे डिजिटल पेमेंट अॅप्समध्ये प्रचंड वाढ झाली आहे. नोटबंदीनंतर कॅशलेस व्यवहारासाठी फोन पे , गूगल अॅप्स , भीम अॅप्स वर सर्वात जास्त पेमेंट केले आहे. यातच करोना काळातही देशात डिजिटल पेमेंटला प्रोत्साहन दिले आहे. मात्र या डिजिटल पेमेंट अॅपपैकी एक अँप्सने भारतातील आपली सर्विस बंद करण्याची घोषणा केली आहे. जर तुम्ही या अॅपचा वापर करीत असाल तर लवकर आपले पैसे यातून काढून घ्या.
याबाबत सविस्तर बातमी अशी की, भारतात PayPal ने २०१७ मध्ये आपली सेवा सुरू केली होती. डिजिटल पेमेंट ही एक वेबसाइट आहे. ज्यावरून ऑनलाइन पेमेंट केली जाते. मात्र, देशातून डिजिटल पेमेंट PayPal apps बंद होणार आहे. याबाबत PayPal चे प्रवक्ता यांनी याबद्दल सविस्तर माहिती देत १ एप्रिलपासून बंद करण्याची घोषणा केली आहे. परंतु, आंतरराष्ट्रीय पेमेंटसाठी PayPal चा वापर सुरू राहणार आहे. मात्र तुम्हाला PayPal appsचे अकॉऊंट बंद करायची असेल तर जाणून घ्या सोपी पद्धत पुढीलप्रमाणे …
- सर्वात आधी तुम्ही PayPal च्या वेबसाइटवर जा. त्यानंतर सेटिंगमध्ये जा.
- सेटिंगमध्ये गेल्यानंतर अकाउंट ऑप्शनमध्ये जा. यानंतर आपल्या बँकच्या अकाउंट नंबर टाका.
- त्यानंतर नवीन पेजवर जाऊन क्लोज अकाउंटवर क्लिक करा.
- जर तुमचे अकाउंट अशाप्रकारे बंद होणार नसेल तर तुम्ही ईमेल वरूनही या अकाउंटला बंद करू शकता.