वाघोली – दिल्ली सरकार महिला आयोगातर्फे दरवर्षी देशातील वेगवेगळ्या विभागात क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केलेल्या महिलांना वार्षिक पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येते. 2022 यावर्षीचा पुरस्कार वाघोली येथील योगिता धर्मेंद्र सातव यांना दिल्ली महिला आयोगाच्या अध्यक्ष स्वाती मालीवाल, पर्यावरण मंत्री गोपाल राय यांच्या हस्ते शाल, प्रमाणपत्र व 50 हजार रूपयांचा धनादेश देऊन सन्मानित करण्यात आले.
यावेळी दिल्ली सरकारचे मंत्री गोपाल राय यांनी मी पुण्यात आल्यावर आपल्याला भेटायला आपल्या घरी नक्की येईल, असे आश्वासन योगिता यांना दिले. सातव यांना दिल्ली सरकारचा पुरस्कार मिळाल्याबद्दल माजी मंत्री लक्ष्मणराव ढोबळे व माजी आमदार भानुदास मुरकुटे, राष्ट्रवादीचे नेते राजेंद्र सातव पाटील, जयश्री राजेंद्र सातव पाटील आदींनी अभिनंदन केले आहे.