जिल्ह्यात ठिकठिकाणी योग दिन उत्साहात

श्री हनुमानगिरी हायस्कूलमध्ये योगाची प्रात्यक्षिके

पुसेगाव – पुसेगाव येथील श्री सेवागिरी शिक्षण प्रसारक मंडळ संचलीत श्री हनुमानगिरी हायस्कूल, ज्युनि. कॉलेजमध्ये आंतरराष्ट्रीय योगदिनानिमित्त विद्यार्थ्यांनी विविध योगासनांची प्रात्यक्षिके केली.

तज्ञ क्रीडा शिक्षक संजय जाधव यांनी विद्यार्थ्यांना योगासनाची माहिती समजावून सांगितली. या योग शिबिरात केंद्र प्रमूख श्री प्रमोद जगदाळे, मुख्याध्यापक गोफणे डी. एन.,पर्यवेक्षक श्रीधर जाधव, आर. एन. जाधव, सुधाकर माने उपस्थित होते

Leave A Reply

Your email address will not be published.