कोरेगाव मतदारसंघातील रस्त्यांसाठी 10.37 कोटी

आ. शशिकांत शिंदे यांची माहिती

बुध- कोरेगाव विधानसभा मतदार संघातील कोरेगाव व सातारा तालुक्‍यातील रस्त्यांच्या कामांना अर्थसंकल्पीय जून 2019 मधून 5054 योजनेंतर्गत राज्यमार्ग व इतर जिल्हा मार्गाच्या कामासाठी आ. शशिकांत शिंदे यांच्या विशेष प्रयत्नातून रु. 10.37 कोटी मंजूर झाले आहेत.

वडूथ-सातारारोड – अंबवडे – किन्हई ते प्रजिमा 4 रस्ता प्रजिमा 36 किमी 3/00 ते 18/200 (सा.क्र. 7/300 ते 8/500) , (भाग- सातारारोड गाव) बंदिस्त गटर वं पादचारी चे काम करणे रक्कम रुपये 300 लक्ष, खंडाळा कोरेगाव रहिमतपूर कराड सांगली शिरोळ रस्ता रा.मा. 142 किमी (सा. क्र. 52/00 ते 54/00) (भाग- तहसील ऑफिस ते डी. पी. भोसले कॉलेज) रस्त्याच्या बाजूला पादचारी मार्ग व गटर्स बांधकाम करणे ता. कोरेगाव रक्कम रु. 300 लक्ष, रा. मा. 140 ते अंगापूर वर्णे नागठाणे तारळे पाटण रस्ता प्रजिमा 37 किमी 5/400 ते 6/800 ते 7/400 ते 8/600 (भाग- अंगापूर ते वर्णे) मध्ये सुधारणा करणे.

ता. जि. सातारा रक्कम रु. 70 लक्ष , रा. मा. 140 ते कोडोलो देगाव निगडी वर्णे प्रजिमा 28 किमी सा. क्र. 3/00 ते 6/00 (भाग एमआयडीसी ते देगाव ) रुंदीकरण वं डांबरीकरण करणे ता. जि. सातारा रक्कम 90.00 लक्ष, वडूथ सातारारोड अंबवडे किन्हई ते प्रजिमा 4 रस्ता प्रजिमा 36 किमी 3/00 ते 18/200 (सा. क्र. 9/000 ते 18/200) ,(भाग सातारारोड चौक ते किन्हई गाव) चे रुंदीकरण व डांबरीकरण करणे ता. कोरेगाव जि. सातारा रक्कम रु. 250.00 लक्ष, जिहे कठापूर कोरेगाव तडवळे खेड रस्ता प्रजिमा 34 किमी (सा. क्र. 0/600 ते 1/500) ची सुधारणा करणे, ता. कोरेगाव रक्कम रु. 27.00 लक्ष मंजूर करण्यात आले आहेत.

लवकरच निविदा प्रक्रिया होऊन रस्त्यांच्या कामाला सुरुवात होणार आहे. सदर रस्ते दळणवळनाच्या दृष्टीने अतिशय महत्वाचे असून रस्त्यांच्या कामासाठी निधी उपलब्ध झाल्याने लवकरच वाहतूक जलद वं सुरळीत होण्यास मदत होणार आहे.

ग्रामीण भागातील अत्यंत महत्वपूर्ण अशा रस्त्यांच्या कामासाठी मा. आ. शशिकांत शिंदे यांनी सतत पाठपुरावा केला असून सदर रस्त्यांना मंजुरी मिळाल्याने नागरिकांची व वाहनधारकांची चांगली सोय होणार आहे. कोरेगाव विधानसभा मतदारसंघातील विकासकामांसाठी मी प्रयत्नशील असून या रस्त्यांच्या कामांमुळे दळणवळणसुलभ होण्यास मदत होणार आहे.

भविष्यातही मतदारसंघाच्या विकासासाठी विविध योजनेतून निधी आणण्यासाठी आपण कटिबद्ध आहोत. मतदार संघाच्या विकासासाठी रस्ते हा प्रमुख घटक असून मतदारसंघात रस्त्यांचे जाळे विणण्यात यश आले असून उर्वरित विकासकामे पूर्ण करण्यासाठी आपण प्रयत्नशील असल्याचे त्यांनी सांगितले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)