* ८ एप्रिल पासून सुरू होणार होती यात्रा
* कळंब उपविभागीय दंडाधिकारी अहिल्या गाठाळ यांनी दिली माध्यमांना माहिती
* देशभरातून यात्रेनिमित्त येतात ८ ते १० लाख भाविक
* कोरोनामुळे घेतली खबरदारी
येरमाळा- उस्मानाबाद जिल्ह्यातील कळंब तालुक्यात असणाऱ्या येरमाळा येथील येडेश्वरी देवीची यात्रा यावर्षी कोरोनामुळे रद्द करण्यात आली आहे. येत्या ८ एप्रिल पासून ही यात्रा सुरू होणार होती.
चार ते पाच दिवस भरणाऱ्या या यात्रेत दरवर्षी देशभरातुन आठ ते दहा लाख भाविक देवीच्या दर्शनासाठी येत असतात. परंतु वाढत्या कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे प्रशासन, देवस्थान व यात्रा कमिटी तसेच ग्रामस्थांनी बैठक घेऊन यात्रा रद्द करण्याचा निर्णय घेतला. यावेळी कळंब उपविभागीय दंडाधिकारी अहिल्या गाठाळ यांनी पत्रकार परिषद घेऊन माध्यमांना ही माहिती दिली.