बुलडाणा : कोरोना विषाणूची लागण झालेल्या संशयीताचा बुलढाणा येथे मृत्यू झाला आहे. हा रुग्ण सौदी अरेबिया येथून परतला होता. रुग्णाला ताप आणि सर्दीची लक्षणे आढळल्यामुळे एका खाजगी रुग्णलयात दाखल करण्यात आले होते.
परंतु नंतर रुग्णाला कोरोनाची लक्षणे आढळल्याने बुलढाण्याच्या जिल्हा सामान्य रुग्णालयातील विलगीकरण कक्षात दाखल करण्यात आले होते. राज्यातील हा कोरोना संशयीताचा पहिला मृत्यू आहे. या रुग्णाच्या मृत्यूमुळे बुलढाणा जिल्ह्यात नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
शुक्रवारी सकाळी हा रुग्ण सौदी अरेबिया येथून परतला होता. त्यांचा शनिवारी दुपारी जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे.
दरम्यान, सदरील रुग्णाचा तपासणी अहवाल अद्याप आला नसल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक प्रेमचंद पंडीत यांनी सांगितले. या रुग्णाचे नमुने तपासणीसाठी नागपूर येथे पाठविण्यात आले असून त्याचा अहवाल येणे बाकी आहे.