येडियुरप्पा सरकारला पाठिंबा देणार नाही -कुमारस्वामींचे स्पष्टीकरण

बंगळुरू : कर्नाटकमध्ये झालेल्या राजकीय नाट्याचा शेवट येडीयुरप्पा यांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेऊन केला. दरम्यान, येडियुरप्पा सरकारला आपण पाठिंबा द्यावा अशी जनता दलच्या काही आमदारांनी कुमारस्वामी यांना केली होती. परंतु, आपण येडीयुरप्पा यांना कोणत्याही परिस्थितीत पाठिंबा देणार नसल्याचे माजी मुख्यमंत्री कुमारस्वामी यांनी स्पष्ट केले आहे. कुमारस्वामी यांनी याविषयी एक ट्‌विट केले आहे.

राज्यात पुन्हा एकदा भाजपचे सरकार स्थापन झाल्यानंतर जेडीएसच्या आमदारांनी येडीयुरप्पा सरकारला बाहेरून पाठिंबा द्यावा अशी मागणी काही आमदारांनी केली होती. परंतु, ही मागणी कुमारस्वामी यांनी फेटाळून लावली आहे. तसेच अशा कोणत्याही अफवांवर कार्यकर्त्यांनी विश्‍वास ठेवू नये असे म्हटले आहे. दरम्यान, जर जेडीएसने भाजपला पाठिंबा दिला असता तर राज्यात कॉंग्रेस पुर्णपणे एकटी पडली असती परंतु, कुमारस्वामींच्या एका ट्‌विटमुळे या सर्व शक्‍यतांना पुर्णविराम मिळाला आहे.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.