भारतीय वायुसेनेत जगातील सर्वात शक्‍तीशाली हेलिकॉप्टर्स दाखल

नवी दिल्ली : भारतीय वायुसेनेकडे अमेरिकेच्या बोईंग एरोस्पेस या कंपनीने 22 अपा हेलिकॉप्टरर्सपैकी चार हेलिकॉप्टर सोपवली आहेत. तर आणखी चार हेलिकॉप्टर पुढील आठवड्यात वायुसेनेत दाखल होणार असल्याचे सांगण्यात येत आहे.

एचए 64 ई या श्रेणीतील 4 हेलिकॉप्टर्स भारतीय वायुसेनेत दाखल झाली आहेत, याविषयीची माहिती बोईंगकडून सांगण्यात आली आहे. तर 4 हेलिकॉप्टर्स पुढच्या आठवड्यात वायूसेनेकडे सुपुर्द करण्यात येणार आहेत. तर आणखी 8 हेलिकॉप्टर्स दोन आठवड्यांनी तर उर्वरित येत्या सप्टेंबर महिन्यात वायुसेनेत दाखल होणार असल्याचेही सांगण्यात आले.एचए 64 ई अपा ही जगातील सर्वात शक्‍तीशाली हेलिकॉप्टर्स म्हणून ओळखली जातात तर सध्या अमेरिकेकडून याच हेलिकॉप्टर्सचा उपयोग करण्यात येत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)