यवत : देऊळगाव गाडा (ता.दौंड) येथील चोरीच्या गुन्हातील सुमारे पाच वर्षांपासून व सासवड पोलीस स्टेशन हद्दीतील बलात्काराचे गुन्ह्यातील सुमारे तीन वर्षांपासून फरार असलेला आरोपी जेरबंद करण्यात (दि.२९)रोजी यवत पोलीस स्टेशन गुन्हे शोध पथकाला यश आले असल्याची असल्याची माहिती यवत पोलिस स्टेशनचे पोलीस निरीक्षक नारायण पवार यांनी दिली आहे.
सण २०१७ रोजी फिर्यादी गणेश साधू करे. (वय २१ रा.देऊळगावगाडा,ता.दौंड,जि.पुणे) यांनी यवत पोलीस ठाण्यात तक्रार दिली होती की मौजे देऊळगाव गाडा गावचे हद्दीत यातील गणेश करे यांचे घरातील डब्यातील रोख रक्कम ४५हजार रुपये काढून घेऊन चोरून नेले बाबत (दि.३)ऑक्टो२०१७ रोजी गुन्हा दाखल होता.
सदरचा गुन्हा घडल्यापासून गुन्ह्यातील निष्पन्न व पाहिजे असलेला आरोपी नामे सतिश हिरामण शिंदे. (वय २६ रा.वढाणे,भैरवनाथ मंदिरा जवळ,ता.बारामती,जि.पुणे) हा गुन्हा घडल्यापासून फरार झाला होता. (दि.२९)रोजी सदरचा आरोपी हा वढाणे गावात येणार असल्याची खात्रीशीर बातमी यवत पोलीस स्टेशन गुन्हे शोध पथकाला गोपनीय बातमीदाराच्या आधारे मिळाल्याने सदर पोलीस पथकाने वेषांतर करून वढाणे,ता.बारामती,जि.पुणे येथे गेले असता आरोपी सतिश शिंदे हा पोलिसांची चाहूल लागताच समोरील डोंगरात पळून जाऊ लागला तेव्हा पोलीस पथकाने त्याचा दोन किलो मीटर पाठलाग करून त्यास ताब्यात घेतले असून सदरचा आरोपी सासवड पोलीस ठाण्यातील (गु.र.नं.१२१/२०१९ भा.द.वि.कलम ३७६,पोस्को ४)मध्ये सुद्धा फरार आहे.
सदरची कामगीरी पाेलीस अधीक्षक डॉ.अभिनव देशमुख,अप्पर पोलीस अधीक्षक मिलिंद मोहिते,दौंड उपविभागीय पोलीस अधिकारी राहुल धस यांचे मार्गदर्शनाखाली वरीष्ठ पोलीस निरीक्षक नारायण पवार,पोलीस हवालदार निलेश कदम,गुरुनाथ गायकवाड,पोलीस नाईक अक्षय यादव,गणेश कुतवळ,पोलीस हवालदार सचिन गायकवाड,सायबर पोलीस स्टेशन यांचे पथकाने केली आहे.