मुंबई : बॉलिवूडची सुंदर अभिनेत्री यामी गौतम हिने गुपचूप लग्नीन गाठ बांधली. यामीने सोशल मीडियावर एक फोटो शेअर करत चाहत्यांना ही आनंदाची बातमी दिली.
यामीने आदित्य धरसोबत लग्न केले आहे. यामी गौतम अभिनित ‘उरी’ या चित्रपटाचे दिग्दर्शन आदित्य धर यांनी केलं आहे. या चित्रपटात अभिनेत्रीबरोबर विक्की कौशलदेखील मुख्य भूमिकेत दिसला होता
करोना काळात अनेक कलाकारांनी लग्न उरकून घेतलं आहे. याआधी वरुण धवनने लग्न केलं होतं. यामीने लग्नाचा फोटो शेअर करत चाहत्यांना आश्चर्याचा धक्का दिला आहे. तिच्या पोस्टवर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
View this post on Instagram
यामीने पोस्टमध्ये म्हटलं की, ‘तुझ्या प्रकाशात मी प्रेम करायला शिकले.’ पुढे ती म्हणते की, ‘आमच्या संपूर्ण कुटुंबाच्या आशीर्वादाने, आज आम्ही लग्न केले आहे, हा एक अगदी घरगुती सोहळा होता. खूप कमी लोक उपस्थित असल्याने आम्ही हा आनंदी सोहळा आमच्या कुटुंबासमवेत साजरा केला.’