वाघोली – वाघोली येथे ‘यागा’ (YAAGA) स्वीट आणि डेअरी प्रॉडक्ट शॉपचे उद्घाटन नुकतेच पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ यांचे हस्ते मान्यवरांच्या उपस्थित करण्यात आले.
यावेळी भाजपा जिल्हाध्यक्ष गणेश भेगडे, जिल्हापरिषद सदस्य ज्ञानेश्वर कटके, नगरसेवक व युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष किरण दगडे, माजी नियोजन समिती सदस्य दादासाहेब सातव पाटील,
संजय सातव पाटील, भाजपा प्रदेश कार्यकारणी सदस्य रोहिदास उंद्रे, पुणे जिल्हा नियोजन समितीचे सदस्य रामकृष्ण सातव पाटील, भाजप युवा मोर्चा प्रदेश कार्यकारणी सदस्य गणेश कुटे,
भारतीय जनता युवा मोर्चा पुणे जिल्हा उपाध्यक्ष गणेश सातव व भाजप क्रीडा आघाडीचे हवेली तालुकाध्यक्ष विजय जाचक, प्रदीप सातव पाटील, उपसरपंच मारुती गाडे, सुनील जाधवराव, मंगेश सातव, संदीप कटके आदि उपस्थित होते.
‘पिराजीस’ केकच्या यशस्वी वाटचालीनंतर वाघोली व परिसरातील खवय्यांना ‘यागा’ फ्रेश फार्म अँड स्वीट्स शॉपच्या माध्यमातून विविध स्वरुपाची मिठाई आणि रुचकर खाद्यपदार्थ चाखायला मिळणार आहेत. स्वच्छता, सर्विस, क्वालिटी देणारे पहिले हायजेनिक असे पुणे-नगर महामार्गावरील शॉप असणार आहे.
पिराजीस केक नंतर आता नागरिकांच्या सेवेसाठी यागा (YAAGA) फ्रेश फार्म डेअरी अँड स्वीट या नवीन ब्रॅण्डचे लॉन्चिंग केले असून स्वीट आणि डेअरी प्रॉडक्टमध्ये संपूर्ण हायजेनिक प्रॉडक्ट तयार केले जातात.
वाघोली व परिसरातील नागरिकांची मागणी लक्षात घेऊन यागा ब्रँड लॉन्च केला असून कॉलिटी, सर्विस आणि स्वच्छता याकडे विशेष लक्ष दिले जाणार आहे. तसेच पुढे काही दिवसात पुणे शहरामध्ये सगळ्या भागांमध्ये ‘यागा’चे शॉप ओपन करणार आहे.
– सचिन सोमनाथ सातव (डायरेक्टर, यागा फ्रेश फार्म डेअरी अँड स्वीट)