WPL Live Cricket Score, UPW vs RCB Women’s Premier League 2024 : आज महिला प्रीमियर लीगचा 11 वा सामना यूपी वॉरियर्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्यात खेळला जात आहे. महिला प्रीमियर लीगच्या 11व्या सामन्यात यूपी वॉरियर्सने नाणेफेक जिंकून आरसीबीविरुद्ध प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. ॲलिसा हिलीच्या नेतृत्वाखालील संघ आरसीबीविरुद्धच्या मागील पराभवाचा बदला घेण्यास सक्षम असेल अशी अपेक्षा आहे.
आज एकता बिश्त मानधनाच्या नेतृत्वाखाली आयपीएलमध्ये पदार्पण करणार आहे. श्रेयंका पाटीलच्या जागी तिचा संघात समावेश करण्यात आला आहे. तर, यूपीच्या संघाने एकही बदल केलेला नाही.
UPW vs RCB : दोन्ही संघाची प्लेइंग 11 –
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू: स्मृती मानधना (कर्णधार), सोफी डेव्हाईन, सबिनेनी मेघना, एलिस पेरी, रिचा घोष (विकेटकीपर), सोफी मोलिनक्स, जॉर्जिया वेरेहम, एकता बिश्त, सिमरन बहादूर, आशा शोभना, रेणुका ठाकूर सिंग.
🚨 Team Updates 🚨
UP Warriorz remain unchanged while Ekta Bisht makes her debut for Royal Challengers Bangalore 👌👌
Live 💻📱https://t.co/iplAqFh4Yz#TATAWPL | #UPWvRCB pic.twitter.com/2MDL9kxo2K
— Women’s Premier League (WPL) (@wplt20) March 4, 2024
यूपी वॉरियर्स : एलिसा हिली (विकेटकीपर/कर्णधार), किरण नवगिरे, चमारी अथापथू, ग्रेस हॅरिस, श्वेता सेहरावत, दीप्ती शर्मा, पूनम खेमनार, सोफी एक्लेस्टोन, राजेश्वरी गायकवाड, सायमा ठाकोर, अंजली सरवानी.
दरम्यान, बेंगळुरूच्या एम चिन्नास्वामी स्टेडियमवर खेळल्या जाणाऱ्या या सामन्यात एलिसा हिलीचा संघ आरसीबीविरुद्धच्या मागील पराभवाचा बदला घेण्याचा प्रयत्न करेल. ( UP Warriorz elect to bowl first against Royal Challengers Bangalore ) मंधानाच्या नेतृत्वाखालील संघाने लीगच्या दुसऱ्या सामन्यात यूपीचा दोन धावांनी पराभव केला होता. यूपी वॉरियर्सने या स्पर्धेत आतापर्यंत चारपैकी दोन सामने जिंकले आहेत. त्याचवेळी, आरसीबी दोन सामन्यांत दोन विजयांसह गुणतालिकेत चौथ्या स्थानावर आहे.