WPL Live Cricket Score, UPW vs RCB Women’s Premier League 2024 : आज महिला प्रीमियर लीगचा 11 वा सामना यूपी वॉरियर्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्यात खेळला जात आहे.
महिला प्रीमियर लीगच्या 11व्या सामन्यात यूपी वॉरियर्सने नाणेफेक जिंकून आरसीबीविरुद्ध प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. ॲलिसा हिलीच्या नेतृत्वाखालील संघ आरसीबीविरुद्धच्या मागील पराभवाचा बदला घेण्यास सक्षम असेल अशी अपेक्षा आहे.
🚨 Toss Update 🚨
UP Warriorz elect to bowl first against Royal Challengers Bangalore.
Live 💻📱https://t.co/iplAqFh4Yz#TATAWPL | #UPWvRCB pic.twitter.com/zzB3fmoMeq
— Women’s Premier League (WPL) (@wplt20) March 4, 2024
आज एकता बिश्त मानधनाच्या नेतृत्वाखाली आयपीएलमध्ये पदार्पण करणार आहे. श्रेयंका पाटीलच्या जागी तिचा संघात समावेश करण्यात आला आहे. तर, यूपीच्या संघाने एकही बदल केलेला नाही.
दरम्यान, बेंगळुरूच्या एम चिन्नास्वामी स्टेडियमवर खेळल्या जाणाऱ्या या सामन्यात एलिसा हिलीचा संघ आरसीबीविरुद्धच्या मागील पराभवाचा बदला घेण्याचा प्रयत्न करेल. ( UP Warriorz elect to bowl first against Royal Challengers Bangalore ) मंधानाच्या नेतृत्वाखालील संघाने लीगच्या दुसऱ्या सामन्यात यूपीचा दोन धावांनी पराभव केला होता.
यूपी वॉरियर्सने या स्पर्धेत आतापर्यंत चारपैकी दोन सामने जिंकले आहेत. त्याचवेळी, आरसीबी दोन सामन्यांत दोन विजयांसह गुणतालिकेत चौथ्या स्थानावर आहे.