WPL Live Cricket Score, GG vs UPW Women’s Premier League 2024 : महिला प्रीमियर लीगच्या पाच संघांमधील प्लेऑफची लढत सुरू झाली आहे. मुंबई आणि दिल्ली प्लेऑफमध्ये पोहोचले असून, आता लढत तिसऱ्या स्थानासाठी आहे. आरसीबी, यूपी आणि गुजरात यांच्यात स्पर्धा आहे. महिला प्रीमियर लीग 2024 चा 18 वा सामना आज दिल्लीतील अरुण जेटली स्टेडियमवर गुजरात जायंट्स आणि यूपी वॉरियर्स यांच्यात खेळला गेला.
विजयासाठी 153 धावांचा पाठलाग करताना यूपी वॉरियर्स संघाला 20 षटकात 5 बाद 144 धावसंख्येपर्यंतच मजल मारता आली आणि गुजरात जायंट्सने यूपी वॉरियर्सचा आठ धावांनी पराभव करत मागील पराभवाचा बदला घेतला. या सामन्यातील विजयासह गुजरातच्या प्लेऑफमध्ये पात्र ठरण्याच्या आशा कायम राहिल्या आहेत.
Incredible fighting knock!@Deepti_Sharma06 nearly pulled off a memorable win for the @UPWarriorz
Live 💻📱https://t.co/WHTYqs2Bd5 #TATAWPL | #GGvUPW pic.twitter.com/jpDiBMUljw
— Women’s Premier League (WPL) (@wplt20) March 11, 2024
दीप्ती शर्मा आणि पूनम खेमनार यांच्यात अर्धशतकी भागीदारी झाली, मात्र दोघींही संघाला विजयापर्यंत नेऊ शकल्या नाहीत. यूपी वॉरियर्सकडून फलंदाजीत दीप्ति शर्माने एकाकी झुंज दिली. तिने 60 चेंडूत 9 चौकार आणि 4 षटकारासह नाबाद सर्वाधिक 88 धावांची खेळी केली. तिला पूनम खेमनारचीही साथ लाभली. पूनम 36 चेंडूत 36 धावा काढून नाबाद राहिली. या दोघींव्यतीरिक्त एकाही फलंदाजांला दुहेरी आकडा गाठता आला नाही. गुजरातकडून गोलंदाजीत शबनम शकीलने सर्वाधिक 3 गडी बाद केले.
तत्पूर्वी, महिला प्रीमियर लीगच्या 18 व्या सामन्यात गुजरात जायंट्सने प्रथम फलंदाजी करताना 20 षटकात 8 बाद 152 धावांपर्यत मजल मारली होती. कर्णधार बेथ मुनीने नाबाद अर्धशतक झळकावले. तिने 52 चेंडूत 10 चौकार अन् 1 षटकारासह सर्वाधिक 74 धावा केल्या. या स्टार फलंदाजाने लॉरासोबत पहिल्या विकेटसाठी 60 धावांची भागीदारी केली. 24 वर्षीय दक्षिण आफ्रिकेची फलंदाज आठव्या षटकाच्या पाचव्या चेंडूवर 43 धावा काढून बाद झाली. त्यानंतर दयालन हेमलता तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीला आली आणि खाते न उघडताच बाद झाली.
Innings Break ‼@Giant_Cricket set a target of 153 🎯 for @UPWarriorz
Will #UPW successfully chase this down? 🤔#TATAWPL | #GGvUPW pic.twitter.com/xNplNIZxbn
— Women’s Premier League (WPL) (@wplt20) March 11, 2024
नवव्या षटकानंतर यूपीविरुद्ध गुजरातची फलंदाजी ढासळली. फोबी चार, ॲश्ले गार्डनर 15, भारती फुलमाली एक, कॅथरीन ब्राइस 11 आणि तनुजा एक धाव करू शकली. तर, मेघना सिंग खाते न उघडता कर्णधार मुनीसह नाबाद राहिली.
यूपी वॉरियर्स कडून गोलंदाजीत सोफीने तीन तर दीप्तीने दोन विकेट घेतल्या. याशिवाय राजेश्वरी गायकवाड व चामरी अटापट्टू यांना प्रत्येकी एक यश मिळाले.