तळेगाव दाभाडे, (वार्ताहर) – तळेगाव दाभाडे शहर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार गटाच्या अध्यक्षपदी नंदकुमार सोपानराव कोतुळकर यांची नियुक्ती करण्यात आली.
कोतुळकर यांना तालुका अध्यक्ष दत्तात्रय पडवळ यांच्या सहीचे नियुक्ती पत्र लोणावळा येथील जाहीर सभेत पक्षाचे अध्यक्ष, खासदार शरद पवार, जगन्नाथ शेवाळे, मदन बाफना यांच्या उपस्थितीत देण्यात आले. कोतुळकर हे काँग्रेस विचारसरणीचे निष्ठावंत कार्यकर्ते आहेत.
ते तळेगाव दाभाडे नगर परिषदेचे माजी उपनगराध्यक्ष होते. यावेळी बोलताना कोतुळकर म्हणाले की, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या स्थापनेपासून पवार साहेबांच्या विचारांशी एकरूप झालेलो आहे. तालुक्यामध्ये पक्ष संघटना मजबूत करण्यासाठी प्रयत्न करणार आहे.