WPL Live Cricket Score, DC vs GG Women’s Premier League 2024 : आज महिला प्रीमियर लीग 2024 चा शेवटचा लीग सामना दिल्ली कॅपिटल्स आणि गुजरात जायंट्स यांच्यात खेळला जात आहे. बेथ मूनीने नाणेफेक जिंकून दिल्लीविरुद्ध प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आणि 20 षटकांत नऊ गडी गमावून 126 धावा केल्या.
महिला प्रीमियर लीगच्या शेवटच्या सामन्यात दिल्ली कॅपिटल्सने गुजरात जायंट्सविरुद्ध घातक गोलंदाजी केली. बेथ मुनीच्या नेतृत्वाखालील संघाला 126 धावांपर्यंतच मजल मारता आली. या सामन्यात गुजरात संघाचे फलंदाज संघर्ष करताना दिसले. फलंदाजीला सुरुवात करण्यासाठी आलेली कर्णधार खाते न उघडताच पॅव्हेलियनमध्ये परतली. त्याचवेळी तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीला आलेली दयालन हेमलताला केवळ चार धावा करता आल्या. गुजरातला तिसरा धक्का लॉरा वोल्वार्डच्या रूपाने बसला, जिला केवळ सात धावा करता आल्या.
Innings Break‼️@DelhiCapitals restrict #GG to 126/9
Will #DC successfully chase it down to confirm their place in the #TATAWPL Finals? 🤔
Live 💻📱https://t.co/qXiPrN1UKL#TATAWPL | #DCvGG pic.twitter.com/IKg7zvqlTN
— Women’s Premier League (WPL) (@wplt20) March 13, 2024
या सामन्यात भारती फुलमाळी व्यतिरिक्त संघाच्या अन्य कोणत्याही फलंदाजाला चांगली कामगिरी करता आली नाही. तिने 36 चेंडूत 42 धावांची खेळी खेळली. या काळात तिच्या बॅटमधून सात चौकार आले. तिच्याशिवाय कॅथरीन ब्राईसने नाबाद 28 धावा, फोबी लिचफिल्डने 21 धावा, ऍशले गार्डनरने 12 धावांची खेळी केली. तनुजा कंवर शून्य तर शबनम शकील 1 धाव काढून बाद झाली. मन्नत कश्यप एकही धाव न काढता नाबाद राहिली.
मॅरिझान कॅप, शिखा पांडे आणि मिन्नू मणी यांनी दिल्लीसाठी घातक गोलंदाजी केली. तिघींनी प्रत्येकी दोन गडी बाद केले. त्याच वेळी जेस जोनासनला 1 यश मिळाले.