Car Care Tips in Summers : उन्हाळ्याचे आगमन होताच अनेक प्रकारच्या समस्या वाहनांमध्ये दिसू लागतात. तीव्र सूर्यप्रकाश आणि उष्णतेमुळे इंजिन, टायर, बॅटरी आणि वाहनाचे इतर भाग जास्त प्रमाणात गरम होतात. कडक सूर्यप्रकाश आणि वाढत्या उष्णतेमुळे वाहनाचे इंजिन जास्त तापू शकते, टायर फुटू शकतात आणि एसी नीट काम करू शकत नाही. ( Car Care Tips in Summers )
अशा परिस्थितीत, उन्हाळ्यापूर्वी जर तुम्ही तुमची कार व्यवस्थित तपासली तर तुम्हाला वाटेत कोणतीही अडचण येणार नाही. आज आम्ही तुम्हाला काही गोष्टी सांगत आहोत ज्या तुम्ही उन्हाळा येण्यापूर्वी किंवा आत्ताच तुमच्या कारमध्ये तपासू शकता. ज्यामुळे ऐन प्रवासादरम्यान तुम्हाला कोणत्याही अडचणीचा सामना करावाला लागणार नाही. ( Car Care Tips in Summers )
1. इंजिन ऑइल :
उन्हाळ्यापूर्वी तुम्ही तुमच्या कारमध्ये पहिली गोष्ट तपासली पाहिजे ती म्हणजे इंजिन ऑइल. वाहनातील इंजिन ऑइलची पातळी तपासा. उन्हाळ्यात इंजिन खूप गरम होते. इंजिन ऑइल वाहनाच्या इंजिनला वंगण घालते आणि ते थंड ठेवते.
त्यामुळे कारमध्ये पुरेशा प्रमाणात इंजिन ऑइल आणि कूलंट असणे गरजेचे आहे. जर तुम्ही तुमचे इंजिन ऑइल बराच काळ बदलले नसेल तर ते बदलून घ्या. ( Car Care Tips in Summers )
2. ऑईल फिल्टर :
कारमध्ये इंजिन ऑइलसोबतच ऑईल फिल्टरलाही खूप महत्त्व आहे. कारचे आरोग्य चांगले ठेवण्यासाठी ऑईल फिल्टर नियमितपणे बदलणे अत्यंत आवश्यक आहे.
3. कूलंट :
कूलंट इंजिनमधून उष्णता काढून टाकते. वाहनात शीतलक (कूलंट) पुरेशा प्रमाणात नसल्यास, वाहनातील उष्णता बाहेर पडू शकणार नाही आणि वाहन जास्त गरम होऊ शकते. उन्हाळ्यात शीतलक पातळी कमी होऊ शकते. म्हणून, कारमधील कूलंट तपासणे फार महत्वाचे आहे. वेळ पडल्यास आपण कूलंट देखील बदलू शकता.
4. बॅटरी :
कारची बॅटरी ही सर्वात महत्त्वाची मानली जाते कारण त्यातूनच तुमची गाडी सुरू होते. याशिवाय कारमधील इतर अनेक गोष्टी बॅटरीच्या मदतीने चालतात. जर बॅटरी नीट काम करत नसेल तर तुम्हाला कार सुरू करताना त्रास होऊ शकतो,
आणि तुम्हाला कार चालू करण्यासाठी कोणाचा तरी धक्का किंवा मदत घ्यावी लागेल. उन्हाळ्यात बॅटरी लवकर खराब होऊ शकते. म्हणून, बॅटरी टर्मिनल्स, चार्जिंग सिस्टम आणि ऍसिड पातळी नक्की तपासा.