नवी दिल्ली – आरोग्य मंत्रालयाने गुरूवारी जारी केलेल्या आकडेवारीनुसार, काल दिवसभरात 41,806 नव्या करोनाबाधितांनी नोंद करण्यात आली आहे. त्याचबरोबर काल 39,130 रुग्ण करोनामुक्त झाले आहेत.
देशातील सक्रिय करोना रुग्णसंख्या सध्या चार लाखांहून अधिक आहे. देशात 4 लाख 32 हजार रुग्णांवर उपचार सुरु आहेत. करोनामुळे आतापर्यंत एकूण 4 लाख 11 हजार 989 लोकांचा मृत्यू झाला आहे. आतापर्यंत एकूण 3 कोटी 1 लाख 44 हजार रुग्ण करोनामुक्त झाले आहेत.
महामारीच्या सुरुवातीपासून आतापर्यंत तीन कोटी 9 लाख 87 हजार लोकांना करोनाचा संसर्ग झाला आहे. आरोग्य मंत्रालयाने जारी केलेल्या आकडेवारीनुसार,
14 जुलैपर्यंत देशभरात 39 कोटी 13 लाख करोना लसींचे डोस देण्यात आले आहेत. काल दिवसभरात 34 लाख 97 हजार लसींचे डोस देण्यात आले आहेत.