धारवाड जिल्ह्यातील लोकूर गाव. भीमन्ना नरसिंगवर कुटुंब देशातील सर्वात मोठ्या संयुक्त कुटुंबांपैकी एक आहे. कुटुंबात 140 सदस्य राहतात. यात 80 पुरुष व 60 महिला आहेत. 18 वर्षापर्यंत वय असलेले 30 जण आहेत. घराच्या अंगणात सात-आठ चुलींवर अंघोळ करण्यासाठी पाणी गरम होत होते. एका खोलीतून पीठ गिरणीचा आवाज येत होता. कुटुंबातील सदस्य मंजुनाथ यांनी सांगितले, की कुटुंबाकडे डाळ, हरभरा पीठ, मैदा व ज्वारी दळण्यासाठी स्वत:च्या दोन गिरणी आहेत.
सर्वांचा स्वयंपाक एकाच वेळी तयार होतो. तेही तीन वेळा. एकावेळी कमीतकमी 300 ज्वारीच्या भाकरी बनवल्या जातात. 40 गायी आहेत, ज्या दररोज 150 लीटर दूध देतात. साठ लीटर दुधाचा वापर घरातच केला जातो. कुटुंबाकडे 200 एकर जमीन आहे. नव्वद वर्षीय ईश्वरप्पा सांगतात, सात पिढ्यांपूर्वी कुटुंब महाराष्ट्रातील हटकल अन्गदामधून येथे स्थायिक झाले. तेव्हापासून कोणतीही वाटणी झालेली नाही.
या काळात अनेक संकटे आली व गेली. परंतु कुटुंब एकत्र राहिले. 1998 पासून सहा वर्षे सतत दुष्काळ होता. कर्ज काढावे लागले, जे वाढल्यामुळे चार कोटींवर पोहोचले आहे. आम्ही यावर मार्ग शोधला आहे. आम्ही 15 एकर जमीन विकणार आहोत. येथे वीस ते पंचवीस लाख रुपये प्रतिएकर असा भाव आहे. शेती करणारे देवेंद्र सांगतात, दररोज शेतात 50 मजूर काम करतात.
कुटुंबात दरवर्षी दोन ते तीन लग्ने होतात. एकावर दहा लाख खर्च येतो. शिक्षणावरही खर्च केला जातो. सून पद्मा अभिमानाने सांगतात, कुटुंबात 80 वयापेक्षा कमी वयात कोणाचाही मृत्यू झालेला नाही. दरवर्षी मुंबई, बंगळुरू, हुबळीतील 15 ते 20 विद्यार्थी कुटुंबावर संशोधन करतात. दिग्दर्शक केतन मेहता यांनी चित्रपटही तयार केला आहे.
स्वयंपाक बनेल एकाच चुलीवर – वाढत्या गरजेमुळे कुटुंबाची 6 घरे आहेत. संपूर्ण घराचा स्वयंपाक 1975 मधील जुन्या स्वयंपाक घरात होतो. सगळ्यांची जबाबदारी ठरली आहे – 30 मुलांचा अभ्यास 20 कि.मी. लांब राहणारे मंजूनाथ घेतात. 75 वर्षांची कस्तुरी स्वयंपाक बघते. सुना-मुली मदत करतात. देवेंद्र शेतीचे काम बघतात.
सगळे एकत्र बसून तक्रारी सोडवतात – एकत्र बसून तक्रारींचे निवारण करतात. 90 वर्षांच्या ईश्वरप्पांचा निर्णय अंतिम असतो. त्यांचे म्हणणे कोणीही टाळत नाहीत. बालपणीच साधेपणा शिकवतात – कुटुंबाचे मोठे वैशिष्ट्य म्हणजे साधेपणा. कमी साधनांनी देखील जगता येते व प्रत्येक समस्येवर उपाय शोधता येतो हे अगदी लहानपणापासूनच मुलांना शिकवले जाते.