पिंपरी (प्रतिनिधी) – निसर्ग आपल्याला भरभरून देत असतो. त्याचा समतोल सांभाळण्याची प्रत्येकाची जबाबदारी आहे. ही जबाबदारी आपण ओळखायला हवी. झाडे लावुया, झाडे जगवूया, असा पर्यावरण संवर्धनाचा संदेश गायिका व अभिनेत्री सायली सांभारे-राजहंस यांनी शुक्रवारी (दि. ५) दिला.
https://www.facebook.com/217046208635092/posts/1233211800351856/
जागतिक पर्यावरण दिनानिमित्त त्यांनी एक व्हिडिओ जारी करून हा संदेश दिला आहे. शहरांमध्ये सध्या कॉंक्रीटीकरण वाढत चालले आहे. पर्यावरणाचा ऱ्हास होतो आहे. “निसर्ग’ चक्रीवादळाने शहरातील अनेक झाडे उन्मळून पडली आहेत. अशा परिस्थितीत पर्यावरण संवर्धनासाठी प्रत्येकानेच पुढे येणे गरजेचे आहे. या पार्श्वभूमीवर, त्यांनी पर्यावरण संवर्धनाबाबत जारी केलेला व्हिडिओ संदेश महत्त्वपूर्ण आहे.