पिंपरी (प्रतिनिधी) – विजेचा धक्का लागून 17 वर्षीय मुलाचा मृत्यू झाला आहे. ताथवडे-अशोकनगर येथे गुरुवारी सकाळी अकराच्या सुमारास ही घटना घडली.
मयूर बाळू थोरात असे या मुलाचे नाव आहे. घरातील पत्र्यामध्ये विद्युतप्रवाह उतरला होता. त्याचा शॉक लागल्याने संबंधित मुलाला थेरगाव येथील खासगी रुग्णालयात उपचारासाठी नेण्यात आले. मात्र, उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाला.