आपली पचन क्रिया स्वास्थ्य असेल तर आपले आरोग्यदेखील स्वास्थ्य राहते. कारण ९० टक्के आजाराचे मूळ कारण पचन क्रियांशी संलग्न असते.
मनुष्याचे शरीर स्वास्थ्य तेव्हाच राहते जेव्हा पचन व्यवस्थित असेल. जेव्हा शरीर आणि मन हे दोन्ही व्यवस्थित असतात तरच आपण आपली नेहमीची कामे नीट, व्यवस्थितपणे आपण करू शकतो.
आरोग्य किंवा तब्येत हा शब्द असा आहे की, त्याचा अर्थ काय हे आपल्याला सगळ्यांनाच माहित असतो. पण ते नक्की शब्दात सांगता येत नाही.
आरोग्य म्हणजे जेव्हा शरीर आणि मन व्यवस्थित असते म्हणजेच कोणताही रोग, आजार किंवा वेदना नसतात.
अन्नाचे पचन व्यवस्थित झाले तरच स्वास्थ्य व्यवस्थित राहते. आरोग्यासाठी चांगले राहण्यासाठी शरीरही निरोगी हवे, मनाची उभारीही असावी आणि सामाजिक आरोग्याची स्थितीदेखील चांगली असावी.
चांगली तब्येत किंवा आरोग्य म्हणजे नुसता औषधोपचार नाही तर आनंदी आणि सुखी जीवन ही व्यवस्थित असणे महत्वाचे आहे, अशी शरीराची आणि मनाची अवस्था असते.
भक्कम शरीर म्हणजे ज्यावेळी शरीर संपूर्णपणे काम करण्यास योग्य असते. आपल्या शरीराचा एखादा अवयव नीट काम करत नसेल तर म्हणजेच डोळ्यांना नीट दिसत नसेल, कमी ऐकू येत असेल, सांधे दुखत असतील तरी आपण कामे करतच राहतो.
ज्याला हा कोणताच त्रास नसतो तो जास्त आणि चांगले कामे करू शकणार नाही का? आरोग्य हि संकल्पना अत्यंत व्यापक अर्थाने उपयोगात आणली जाते. आरोग्य म्हणजे स्थुल मनाने शारीरिक, मानसिक, सामाजिक संतुलनाची स्थिती.आरोग्यास असंतुलन निर्माण झाल्यास रोग जडतात.
जी व्यक्ती आपली सामाजिक भूमिका सुव्यवस्थितपणे पार पाडण्यासाठी शारीरिक, मानसिक दृष्टया सक्षम असते. ती आरोग्यसंपन्न मानली जाते. म्हणून आरोग्य ही संकल्पना अत्यंत महत्त्वाची आहे.