मेष : अडीअडचणी अडथळे यांवर मात करून प्रगती साधाल जिद्द व आत्मविश्वास यांचे जोरावर यश मिळवाल.
वृषभ : व्यवसायात कामांना गती दयाल. रेंगाळलेली कामे हाती घेऊन ती पूर्ण करण्याचा चंग बांधाल.
मिथुन : ओळखीतून नवीन कामे मिळतील. जादा कामाची तयारी असेल तर अर्थप्राप्ती चांगली होईल.
कर्क : घरात महिलांना त्यांचे क्षेत्रात प्रावीण्य दाखविता येईल. नवीन खरेदीचे बेत पार पडतील. धावपळ वाढेल.
सिंह : कलाकार, खेळाडूंना यशप्राप्ती होईल. आत्मविश्वास वाढेल. नोकरीत वरिष्ठ व सहकाऱ्यांची साथ मिळेल.
कन्या : कर्तुत्वाला यशाची झालर मिळेल, त्यामुळे आनंद व्दिगुणीत होईल. व्यवसायात कामाचा व्याप वाढेल.
तूळ : नोकरीत महिलांना त्यांचे कार्यक्षेत्र व घर या दोन्हीकडे लक्ष देणे जड जाईल. नवीन कामे सर्तक ठेवतील.
वृश्चिक : वेळेचे व कामाचे योग्य नियोजन करून त्या यशस्वी होतील. खेळत्या भांडवलाची तरतूद करावी लागेल.
धनू : पैशाचा उपयोग योग्य कारणासाठीच व्हावा हा अट्टहास असेल. आप्तेष्ट नातेवाईक यांच्या भेटीचे योग येतील.
मकर : मुलांकडून चांगली बातमी कळेल. महिलांना केलेल्या कष्टाचे सार्थक झाले याचे समाधान मिळेल.
कुंभ : नशीब व प्रयत्न यांची सांगड योग्य प्रकारे घालून यश संपादन कराल. पूरक वातावरणाचीही साथ मिळेल.
मीन : व्यवसायात अशक्यप्राय कामात यश मिळेल. कामाची उमेद दांडगी राहील. घरात गृहकृत्यदक्ष रहाल.