महिलांचे आरोग्य ही काळाची गरज – डाॅ.सोनल खळदे

तळेगाव दाभाडे (31जानेवारी): मावळ शिक्षण प्रतिष्ठानचे सावित्रीबाई फुले महिला महाविद्यालय यांच्या संयुक्त समन्वयाने आहार आणि आरोग्य या विषयी व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले. या प्रसंगी विद्यार्थीनींना मार्गदर्शन करताना “महिलांचे आरोग्य ही काळाची गरज” आहे. आरोग्याचा परिणाम हा शरीरावर होतो तसेच शारीरिक आरोग्याबरोबर मानसिक आरोग्य महत्वाचे आहे. त्यामुळे नियमित चांगला प्रथिनयुकत आणि जीवनसत्वे असलेला आहार घयावा असे डाॅ.सोनल खळदे यांनी सांगितले.
त्याचबरोबर त्यांनी “श्वासावर लक्षकेंदित करून केलेली किया म्हणजे योगा “या शब्दात योगाचे महत्व पटवून दिले. आजार हे शारीरिक, मानसिक, कौटुंबिक, सामाजिक असतात यांचा परिणाम हा आरोग्यवर होतो.कार्यक्रमाला दुसरे वक्ते डाॅ.श्रुती देशमुख होते.त्यांनी विद्यार्थीनींना पारंपारिक आहार घ्यावा. नैसर्गिक गोष्टींचा आहारात वापर करावा. आहार चांगला तर आरोग्य देखील चांगले रहाते,असे मत मांडले.
कार्यक्रमाचे अध्यक्ष महाविद्यालयाचे प्राचार्य एस.डब्ल्यू.मिसाळ सर होते. त्यांनी आपल्या मनोगतात विद्यार्थीनींना योग्य आहार घ्यावा आणि 16 ऑक्टोबर हा दिवस “जागतिक अन्नदिन “म्हणून साजरा करतात असे सांगितले. हा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी महाविद्यालयातील शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थीनींनी सक्रीय सहभाग दाखवला.
– प्रियांका निवडुंगे,
कॉलेज रिपोर्टर,
सावित्रीबाई फुले महिला महाविद्यालय,
तळेगाव दाभाडे

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.