विद्यार्थ्यांनी लुटला विद्यावाणीचा आनंद

पुणे: आबासाहेब गरवारे कॉलेजच्या मीडिया विभागातून दिनांक १४ जानेवारी रोजी पुणे विद्यापीठाच्या विद्यावाणी रेडिओ केंद्राला सद्दीच्छा भेट देण्यात आली. “प्रथम वर्षाच्या विद्यार्थ्यांना रेडिओ प्रसारण, केंद्र, रेकॉर्डिंग स्टुडिओ इ ची माहिती व्हावी आणि त्यात रस निर्माण व्हावा या उद्देशाने या भेटीचे आयोजन करण्यात आले होते” असे शाखेचे सहायक प्राध्यापक तुषार रुपनवर यांनी सांगितले.
प्रथमतः पुणे विद्यापीठाच्या रेडिओ केंद्र संयोजकांनी सर्व विद्यार्थ्यांना प्रेझेन्टेशन च्या आधाराने केंद्राबद्दल ची सगळी माहिती आकर्षक रित्या दिली. त्यांनतर प्रश्नोत्तराचे सत्र घेण्यात आले ज्यायोगे विद्यार्थ्यांच्या मनातील सर्व शंका दूर करण्यात आल्या. शेवटी गटागटाने विद्यार्थ्यांना स्टुडिओमध्ये नेऊन त्यांना रेकॉर्ड करायची संधी देण्यात आली. विद्यार्थ्यांनी विविध कविता, गाणी स्टुडिओत रेकॉर्ड करण्याचा आनंद घेतला.

स्टुडिओत वापरले जाणारे सॉफ्टवेअर,रेडिओ केंद्रांचे प्रकार तसेच उत्पन्नाची साधने याबद्दल विस्तृत माहिती विद्यार्थाना पुरविण्यात आली.”विद्यावाणीतील सर्वच लोकांनी आम्हाला सहकार्य केले…रेडिओचा स्टुडिओ समजून घेताना मज्जा वाटली” असे एका विद्यार्थी प्रतिनिधीने सांगितले.

-निनाद कुलकर्णी,
कॉलेज रिपोर्टर,
आबासाहेब गरवारे महाविद्यालय,पुणे

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.