Stock Market Updates 2 January 2024 : नवीन वर्षाचे दुसरे ट्रेडिंग सत्र मंगळवारी गुंतवणूकदारांनी मोठ्या प्रमाणात विक्री केल्यामुळे बाजारात मोठी घसरण झाली. केवळ फार्मा क्षेत्रातील समभाग घसरणीपासून दूर राहिले. सेन्सेक्स पुन्हा 72,000 च्या खाली घसरला आहे. आजच्या व्यवहाराअंती BSE सेन्सेक्स 380 अंकांच्या घसरणीसह 71,892 अंकांवर तर राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी 76 अंकांच्या घसरणीसह 21,665 अंकांवर बंद झाला.
आजच्या व्यवहारात फार्मा, हेल्थकेअर, मेटल्स, मीडिया, एनर्जी,ऑइल आणि गॅस क्षेत्रातील समभागात खरेदी झाली. तर बँकिंग, आयटी, ऑटो, एफएमसीजी क्षेत्रातील समभाग घसरणीसह बंद झाले. आजच्या व्यवहारात मिड कॅप आणि स्मॉल कॅपवरही नफा बुकिंग दिसून आले. सेन्सेक्समधील 30 समभागांपैकी 24 समभाग घसरले तर केवळ 6 समभाग तेजीत बंद झाले. निफ्टीच्या 50 समभागांपैकी 30 वाढीसह आणि 20 घसरणीसह बंद झाले. आजच्या व्यवहारात, BSE वर सूचीबद्ध कंपन्यांचे मार्केट कॅप 365.21 लाख कोटी रुपयांवर बंद झाले.
वाढणारा आणि घसरणारा समभाग –
आजच्या व्यवहारात सन फार्मा 2.90 टक्के, बजाज फायनान्स 1.91 टक्के, भारती एअरटेल 1.07 टक्के, बजाज फिनसर्व्ह 0.88 टक्के, रिलायन्स 0.86 टक्के, टायटन कंपनी 0.66 टक्के, आयटीसी 0.62 टक्के, पॉवर ग्रिड 0.11 टक्के वाढीसह बंद झाले. तर अल्ट्राटेक सिमेंट 2.46 टक्के, महिंद्रा अँड महिंद्रा 2.44 टक्के, कोटक महिंद्रा 2.42 टक्के, लार्सन 2.31 टक्के, आयसीआयसीआय बँक 1.91 टक्के, विप्रो 1.71 टक्के, टेक महिंद्रा 1.59 टक्के घसरणीसह बंद झाले.