सणसवाडी – येथील महिला तिच्या घरात असताना एकाने महिलेच्या घरात घुसून तिचा विनयभंग करीत तिच्या भावाला देखील मारहाण केली. शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे महिलेने फिर्याद दिली असून पोलिसांनी लक्ष्मण पवार (रा. सणसवाडी) याच्याविरुद्ध गुन्हे दाखल केले आहेत.
सणसवाडी येथील ही पीडित महिला घरात असताना लक्ष्मण हा महिलेच्या घरात आला. तिच्या मनास लज्जा उत्पन्न होईल, असे कृत्य करू लागला.
त्यावेळी महिलेने प्रतिकार केला असताना लक्ष्मण याने तिला मारहाण करीत जीवे मारण्याची धमकी दिली. महिलेचा भाऊ मध्ये आला असताना लक्ष्मण याने भावाला मारहाण केले.