पाबळ (प्रतिनिधी) – पाबळ येथील ‘पदम मनी जैन श्वेतांबर’ तीर्थ पेढी संचलित गोशाळेला भेट देण्यासाठी व मदत उभारणीकरिता आज जैन मुनींसह एक हजार जैन बांधव पायी करत पाबळ मध्ये दाखल झाले आहेत. ही पायी वारी निगडी (पुणे) येथून सुरु झाली होती.
या कार्यक्रमासाठी जैन ट्रस्ट निगडी येथील संयोजकांनी अद्ययावत सुविधा निर्माण करून दिली आहे. यावेळी संयोजकांनी गोशाळेसाठी मदत करण्याचे आवाहन केले. तसेच, या यात्रेच्या पुढील कार्यक्रमात मोठी मदत जाहीर करण्यात येणार असल्याची माहिती दिली.