हिंगोली (प्रतिनिधी) :- शिवसेनेचे हिंगोली जिल्हा संपर्क प्रमूख बबनराव थोरात यांच्यावरील खोटे गुन्हे मागें घ्यावेत. यासंदर्भात हिंगोली वसमत सेनगाव येथील पद अधिकाऱ्यांनी राज्यपाल भगतशिंग कोश्यारी यांना निवेदन दिले आहे.
हिंगोली जिल्हा संपर्क प्रमूख यांच्यावर हिंगोली व पूणे येथे गुन्हे दाखल करून त्याना पोलिसांनी ताब्यात घेतले. यानंतर हिंगोली जिल्ह्यातील हिंगोली, वसमत,सेनगाव तालुक्यातील शिवसैनिक पुन्हा आक्रमक झाले आहेत. शिवसेना संपर्क प्रमूख यांच्या विरुद्ध हिंगोली पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हे खोटे गुन्हे तात्काळ मागे घ्या अन्यथा शिवसेना स्टाईल ने उत्तर देऊ. पुण्यातील भारती पोलिस स्टेशनमध्ये माजी मंत्री उदय सामंत यांच्या गाडीवर झालेल्या हल्ल्यामध्ये संपर्क प्रमूख यांचे नाव घेऊन मुद्दाम खोटा गुन्हा दाखल केला आहे असे, या निवेदनात नमूद करण्यात आले आहे.
हिंगोली जिल्हा संपर्क प्रमूख बबनराव थोरात यांच्या विरुद्ध हिंगोली पोलिस ठाण्यात दाखल केलेला गुन्हा त्वरित मागे घ्या व फिर्यादी सचिन प्रकाश पवार यांची सीआयडी (CID) चौकशी करून त्याने महाराष्ट्रातील सर्व शिवसैनिकाच्या भावना दुखावल्यामुळे त्यांच्या विरुद्ध त्वरित गुन्हा दाखल करावा व तसेंच भारती विद्यापीठ पोलिस ठाण्यात मध्ये दाखल केलेला गुन्हा मागें करून बबनराव थोरात यांची तात्काळ सुटका करावी अन्यथा शिवसेनेच्या वतीने तीव्र आंदोलन करण्यात येईल. असे उपजिल्हा प्रमूख संदेश देशमुख यांच्या नेतृत्वाखाली सेनगाव तहसील मार्फत राज्यपाल भगतशिंग कोश्यारी यांना निवेदन देण्यात आले.
गद्दारांच्या गाड्या फोडा असे वक्तव्य करणारे शिवसेना जिल्हा संपर्क प्रमूख थोरात ताब्यात
या वेळी जिल्हा सन्मयक प्रविण महाजन, तालुका प्रमूख संतोष देवकर ,शहर प्रमूख जगन्नाथ देशमुख, युवा सेना तालुका प्रमूख जगदीश गाढवे यांच्या सह मोठ्या संख्येने शिवसैनिक उपस्थितीत होते.