पुणे : हिंगणे खुर्द येथे राहणाऱ्या एका विद्यार्थीनीस बुधवारी रात्री अचानक ह्दयाचा त्रास होऊ लागला. तिच्या मैत्रीणींनी तिला रुग्णालयात नेण्याचा प्रयत्न केला, मात्र संचारबंदीमुळे त्यांना एकही वाहन मिळाले नाही.
अखेर त्यांनी पुणे पोलिसांकडे मदत मागितली. त्यानंतर काही वेळातच पोलिसांनी पाठविलेल्या एका वाहनाद्वारे तरुणीला रुग्णालयात पोचविण्यात आले. उपचार केल्यानंतर आता तिच्या तब्येतीत चांगलीच सुधारणा होऊ लागली आहे.