विविध सामाजिक उपक्रमांनी आमदार संग्राम थोपटे यांचा वाढदिवस साजरा
भोर : आमदार संग्राम थोपटे यांच्या अभिष्टचिंतन सोहळ्यानिमित्त गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य, खाऊ वाटप, आरोग्य तपासणी शिबीर, भव्य भजन स्पर्धा, होम मिनीस्टर कार्यक्रम, रक्तदान शिबीर, तरुणांसाठी रोजगार मेळावा, कुस्ती स्पर्धा, खास महिलांसाठी चला हवा येऊ द्या, असे सात दिवस विविध उपक्रम भोर, वेल्हे, मुळशीत राबवण्यात आले. आज (दि. 7) आमदार संग्राम थोपटे यांचा वाढदिवस मोठ्या थाटात साजरा करण्यात आला. यावेळी शुभेच्छा देण्यासाठी कार्यकर्त्यांची मोठी रीघ लागली होती. अनेक मान्यवरांनी त्यांना दूरध्वनीवरूनही शुभेच्छा दिल्या.
भोर येथील अनंतराव थोपटे महाविद्यालयाच्या प्रांगणात आमदार संग्राम थोपटे यांच्या वाढदिवसानिमित्त राजगड ज्ञानपीठच्या मानद सचिव स्वरुपा थोपटे, पृथ्वीराज थोपटे यांच्या मार्गदर्शनाद्वारे आणि नियोजनाद्वारे आमदार संग्रामदादा थोपटे गौरव समितीच्या माध्यमातून सकाळी 9 वाजता हभप गणेश महाराज भगत यांचे कीर्तन झाले. यावेळी भजन स्पर्धेतील विजेत्यांना बक्षीस वितरण, आशा सेविकांचा साडी चोळी देऊन सन्मान, 11 दाम्पत्यांचा सत्कार, वारकरी-माळकरी सांप्रादायतील ज्येष्ठ उभयंताचा सन्मान, मतदार संघातील 12 संस्थांतील वृध्दाश्रम, अनाथ आश्रम, वनवासी कल्याण आश्रम यांना त्यांच्या गरजेनुसार किराणा, स्वेटर्स, जर्कीन, स्पिकर, भजन साहित्य, ताटे, पिठांची गिरणी, तेल डब्बे यांचे वाटप करण्यात आले.
यावेळी प्रदेश कॉंग्रेस कमिटी उपाध्यक्ष देविदास भन्साळी, कौतुभ गुजर, आमदार संजय जगताप, प्रभारी सातारा अध्यक्ष श्रीरंग चव्हाण,राजगड ज्ञानपीठाच्या मानद सचिव स्वरुपा थोपटे, पृथ्वीराज थोपटे, तेजस्विनी थोपटे, विठ्ठल झोरे, सचिन साठे, संग्राम मोहेळ, पृथ्वीराज पाटील, तालुकाध्यक्ष गंगाराम मातेरे, नानासाहेब राऊत, शैलेश सोनवणे, दिनकर धरपाळे, दिनकर सरपाले, बाळासाहेब थोपटे, जि. प. सदस्य विठ्ठल आवाळे, अमोल नलावडे, कृष्णाजी शिनगारे, माजी सभापती लहू शेलार, उपसभापती रोहन बाठे, शिवाजी कोंडे,
विकास कोंडे, माऊली पांगारे, उपाध्यक्ष पोपट सुके, खरेदी-विक्री संघाचे अध्यक्ष बाळासाहेब शिंदे, दिलीप हुलावळे, शिवाजी बुचंडे, बाजार समितीचे सभापती अकुंश खंडाळे, आनंद आबवले, अनिल सावले, गटनेते सचिन हर्णसकर, उपनगराध्यक्ष चंद्रकांत मळेकर, समीर सागळे, राजेंद्र शेटे, तालुक्यातील ग्रामपंचायत सरपंच, उपसरपंच, सदस्य, विकास सोसायटीचे अध्यक्ष, उपाध्यक्ष, संचालक , शासकीय अधिकारी, पदाधिकारी, वकील, पत्रकार आदी मान्यवरांनी आमदार संग्राम थोपटे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या.
विधान भवनाची प्रतिकृती असलेला केक
आमदार संग्राम थोपटे यांच्या वाढदिवसानिमित्त विधान भवन प्रतिकृती असलेला केक बनवण्यात आला होता. आमदार संग्राम थोपटे यांना शुभेच्छा देताना भोर वेल्हा मुळशी तालुक्यातील जनसमुदाय.माजी मंत्री अनंतराव थोपटे यांनी तालुका सुजलाम सुफलाम करण्यासाठी पराकष्ठा केली असून त्यांचा वारसा आमदार संग्राम थोपटे हे पुढे चालवत असल्याचे मत प्रदेश कॉंग्रेस उपाध्यक्ष देविदास भन्साळी यांनी व्यक्त केले. यावेळी श्रीरंग चव्हाण, कौस्तुभ गुजर यांनीही मनोगत व्यक्त केले.