वाघोली (पुणे) – भारतीय हवाई दलामध्ये विंग कमांडर पदावर कार्यरत असलेल्या श्रृती उदयसिंग चौहान यांनी मिस इंडिया स्पर्धा 2020-21 मध्ये सहभागी होऊन त्यांनी दोन हजार प्रतीस्पर्धींमधून भारतातून तृतीय क्रमांक पटकावला आहे.
बाहेर देशात भारताचे नेतृत्व करणारी हवाई दलामधील एकमेव महिला आहे. बूट आणि वर्दी घालून देशाची रक्षा करणारी ब्युटी क्वीन सुद्धा होऊ शकते हे चौहान यांनी सिद्ध केले आहे. श्रृती चौहान वाघोली (ता. हवेली) येथील बाईफ रोडवरील साई संस्कृती सोसायटीमधील रहिवाशी आहेत.
चौहान यांनी मिळवलेल्या यशाबद्दल आई-वडील, जिल्हा परिषदेचे माजी सदस्य रामभाऊ दाभाडे, माजी उपसरपंच समीर भाडळे, उपसरपंच महेंद्र भाडळे, ग्रामपंचायत सदस्य सुधीर भाडळे आदींनी अभिनंदन केले आहे.
फोटो- श्रृती चौहान