मुंबई – वाद.. दावे प्रतिदावे अगदी काही राज्यांत बंदी घालूनही केरला स्टोरी हा चित्रपट प्रदर्शित झाला. सुरुवातीला या चित्रपटावरून मोठा गदारोळ निर्माण झाला होता. मात्र चित्रपटाने थिएटरमध्ये हाऊसफूलचा बोर्ड झळकावला. अदा शर्मा स्टारर ‘द केरला स्टोरी’ चित्रपटाची काही केल्या चर्चा थांबताना दिसत नाही. आता या चित्रपटाचा सिक्वल देखील येणार असल्याचा अंदाज वर्तवला जात आहे.
अजूनही चित्रपटाबाबत सोशल मीडियावर लोक संमिश्र प्रतिक्रिया देत आहेत. चित्रपटाने पहिल्या आठवड्यातच जगभरात शंभर कोटींचा टप्पा ओलांडला आहे. लवकरच हा चित्रपट 150 कोटींचा आकडा गाठणार आहे. अदा शर्माच्या चित्रपटाला मिळत असलेला जबरदस्त प्रतिसाद पाहून निर्मात्यांनी या चित्रपटाबाबत नवीन विधान केले आहे. दिग्दर्शक सुदीप्तो सेन यांनी द केरला स्टोरीच्या सिक्वेलबद्दल भाष्य केलं आहे. सुदीप्तो सेनने नुकताच एका मुलाखतीदरम्यान याचा खुलासा केला आहे.
सुदीप्तो सेन म्हणाले की, त्यांच्याकडे अशा अनेक कथा आहेत ज्या त्यांना लोकांपर्यंत पोहोचवायच्या आहेत. ते म्हणाला, ‘द केरला स्टोरीच्या कौतुकानंतर मला आराम करायचा नाही. मी या चित्रपटावर सात वर्षे काम केले आहे, हा चित्रपट हिट होणार हे मला आधीच माहित होते. दिग्दर्शकाचे हे वक्तव्य समोर आल्यानंतर ‘द केरला स्टोरी’च्या सिक्वेलची चर्चा जोरात सुरु झाली आहे.
धर्मांतर,ब्रेक वॉश अशा विविध गोष्टींना हात घालणारी केरला स्टोरीची कथा अक्षरशः थरकाप उडवून देणारी आहे. हा चित्रपट हॉस्टेलमध्ये राहणाऱ्या मुलींची कथा सांगतो. ज्यांना लव्ह जिहादमध्ये अडकल्यानंतर सीरियाला पाठवण्यात येते आणि तेथून परत येण्याचा मार्ग त्यांच्यासाठी कसा बंद होतो त्यांचे पुढे काय होते याबाबत हा चित्रपट भाष्य करतो.
केरला स्टोरीचा ट्रेलर प्रदर्शित झाल्यापासून चित्रपट देशभर चर्चेत होता. काही ठिकाणी या चित्रपटाविरोधात जोरदार निदर्शने देखील झाली. मात्र असं असूनही चित्रपटाने दमदार कमाई केली. अशात चित्रपटाने शंभर कोटींचा गल्ला कमावल्यानंतर सर्वच टीम मेंबर्सने याबाबत आनंद व्यक्त करायला सुरुवात केली आहे.