मुंबई: राज्यावर कोरोनाचे संकट वाढत असताना काही खासगी रुग्णालये मनमानी पध्दतीने दर आकारत आहेत. कल्याण डोंबिवली परिसरातील अनेक कोरोनाबाधित रुग्णांकडून पैसे आकरले जात आहेत. १ मे रोजी राज्यातील कोरोना बाधित रुग्णांना १०० टक्के मोफत उपचार देण्यात येतील, अशी घोषणा केली होती. मग आता पांढऱ्या रेशनधारकांना बिल का आकारले जात आहे? कोरोनामुळे सर्वच व्यवहार ठप्प पडले असताना रेशनकार्डचा रंग बघून उपचार दिला जाईल का ? असा प्रश्न मनसे आमदार राजू पाटील यांनी सरकारला विचारला आहे.
राज्यातील सर्व रुग्णालयांना परिपत्रक काढून मोफत उपचारांबाबत कळविणेआवश्यक होते, तसे परिपत्रक काढलेले आढळून येत नाही त्यामुळे आजही रुग्णांना मोफत उपचार मिळताना दिसत नसल्याचे राजू पाटील म्हणाले. त्यामुळे राज्यात महात्मा जोतिबा फुले जनआरोग्य योजने अंतर्गत कोरोनाग्रस्त रुग्णांना मोफत उपचार पद्धतीमध्ये त्रुटी असलेबाबत मंत्री,सार्वजनिक आरोग्य विभाग राजेशजी टोपे यांना राजू पाटील यांनी पत्र दिले आहे.
राजू पाटील म्हणाले, १ मे, महाराष्ट्रदिन दिवशी राज्यातील कोरोनाग्रस्त १०० टक्के रुग्णांना मोफत उपचार देण्यात येतील अशी घोषणा आरोग्यमंत्र्यांनी केली होती. अशा प्कारे मोफत उपचार देणारे महाराष्ट्र पाहिले राज्य असल्याने सर्वच स्तरातून कौतुक होत होते. राज्यावर कोरोनाचे संकट वाढत असताना काही खासगी रुग्णालये मनमानी पध्दतीने दर आकारणी करीत होते त्यांना चाप लावण्यासाठी घेतलेला हा निर्णय योग्य होता. परंतु असा निर्णय घेतल्यानंतर राज्यातील सर्व रुग्णालयांना परिपत्रक काढून कळविणे आवश्यक होते तसे परिपत्रक काढलेले आढळून येत नाही त्यामुळे आजही रुग्णांना मोफत उपचार मिळताना दिसत नाहीत.
१ मे रोजी राज्यातील #corona_positive १०० टक्के रुग्णांना मोफत उपचार देण्यात येतील अशी घोषणा केली होती, मग आता पांढऱ्या रेशनधारकांना बिल का आकारले जात आहे ? #corona मुळे सर्वच व्यवहार ठप्प पडले असताना रेशनकार्डचा रंग बघून उपचार दिला जाईल का ?@CMOMaharashtra @rajeshtope11 pic.twitter.com/cVsbpmRqTS
— Raju Patil (@rajupatilmanase) May 17, 2020
कल्याण-डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रातील शास्त्रीनगर रुग्णालय हे कोरोना रुग्णालय म्हणून घोषित करण्यात आले आहे तर कल्याण मधील हॉलीक्रॉस, डोंबिवली मधील आर.आर.आणि पडले ठाणे येथीलनियॉन या खासगी रुग्णालयांबरोबर सामंजस्य करार करण्यात आला आहे. महानगरपालिका आयुक्तांकडून या रुग्णालय प्रशासनाला पत्रक काढून रुग्णालयात दाखल होणाऱ्या कोविड -19 रुग्णाकडून उपचारासाठी बिल आकारण्याच्या पद्धती विशद केल्या आहेत.
वास्तविक शासनाकडून कोविड-19 रुग्णांसाठी मोफत उपचार देण्याची घोषणा करण्यात आली असेल तर अशा पध्दतीने बिल आकारण्याबाबत पत्रक कसे काढण्यात आले आहे, त्यामुळे सर्वजण संभ्रमात आहेत. त्यामुळे शासनाच्या निर्णयामध्ये अधिक स्पष्टता करून शासन निर्णय राज्यातील सर्व खासगी रुग्णालयांना लागू करण्याची आवशकता आहे. तातडीने या विषयाची दखल घेऊन राज्यातील सर्व कोरोनाग्रस्त रुग्णांना मोफत उपचार देण्याबाबतच्या निर्णयाबाबत सर्व रुग्णालयांना आदेश द्यावेत,अशी मागणी राजू पाटील यांनी केली.