मुंबई – ‘मस्तराम’ वेब सिरीजमधून प्रसिद्धी झोतात आलेली अभिनेत्री केनिशा अवस्थी आपल्या लूकमुळे चांगलीच चर्चेत असते. नुकतीच केनिशा एका कार्यक्रमात पोहोचली होती. जिथे तिची बोल्ड स्टाइल चर्चेचा विषय ठरली. केनिशा यावेळी ब्लॅक कलरच्या डीप नेक ड्रेसमध्ये इव्हेंटमध्ये पोहोचली होती. या ड्रेसमध्ये केनिशाचा किलर लूक पाहून चाहतेही वेडे झाले होते.
केनिशा अवस्थीच्या या व्हिडिओवर यूजर्स जोरदार कमेंट करत आहेत. सोशल मीडियावर अधिराज्य गाजवणाऱ्या या व्हिडिओतील केनिशाची स्टाइल खूप पसंत केली जात आहे. कोणी अभिनेत्रीला सुंदर म्हणत आहेत, तर कोणी तिच्या लूकचे कौतुक करत आहेत. काहींनी तर तिला मस्तरामचा पुढील पार्ट येणार का ? असा सवाल विचारला आहे. सोशल मीडियावर अशा अनेक कमेंट्स करून लोक आपली प्रतिक्रिया देत आहेत.
View this post on Instagram
केनिशा अवस्थीबद्दल सांगायचे तर ती पहिल्यांदा हंसमुख वेब सीरिजमध्ये दिसली. यानंतर, केनिशा एमएक्स प्लेयरच्या बोल्ड सीरिज मस्तराममध्ये दिसली. या मालिकेत तिने मिस रीटाची भूमिका साकारली होती. तिच्या बोल्ड कॅरेक्टरमुळे ती खूप चर्चेतही आली होती.