पुणे : शहरात करोना रुग्णांची संख्य दिवसेंदिवस वाढत आहे. ही पार्श्वभूमी लक्षात घेऊन आता महापालिकेकडून खराडी येथे नवीन कोविड सेंटर सुरू करण्यात येणार आहे. हे कोविड सेंटर सुरू होण्यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे शहराध्यक्ष कल्पेश यादव यांनी प्रयत्न केले होते. अखेर त्यांच्या या प्रयत्नाला यश आले आहे. एवढेच नव्हे तर याच कोविड सेंटरला लागणाऱ्या प्राण वायूसाठीचा खर्च देखील स्वतः करण्याबाबत मनविसे शहराध्यक्ष कल्पेश यादव यांनी तयारी दर्शवली आहे.
यादव म्हणाले, खराडी येथील कोविड सेंटर मध्ये, रुग्णांसाठी ऑक्सिजन बेड देखील उपलब्ध करून दिले जाणार आहेत. सध्या पुण्यात बेड आहे पण ऑक्सिजन नाही अशी अवस्था आहे. महापालिका प्रशासन कठोर प्रयत्न करीत आहे. यासाठी मोठा आर्थिक बोजा देखील प्रशासनावर आहे. हे लक्षात घेऊन खराडी येथील कोविड सेंटर साठी ऑक्सिजनची उपलब्धी करण्यासाठी येणार खर्च करण्याची तयारी आम्ही महापौर मुरलीधर मोहोळ यांची भेट घेऊन व्यक्त केली आहे.
सध्याची परिस्थितीत राजकारण न करता प्रशासनाला साथ देऊन लोकांचे प्राण वाजवणे महत्वाचे आहे. हे करत असतांना खारीचा वाटा म्हणून आम्ही हा खर्च करण्याची तयारी दर्शवली आहे. नागिरकांच्या हितासाठी आणि प्रशासनाला सहकार्य म्हणून माझा हा प्रयत्न आहे. याबाबत मी महापौरां सोबत चर्चा केली असून, लवकरच अंतिम निर्णय होणार असल्याचे यादव यांनी सांगितले.