नवी दिल्ली -करोना संसर्गाची प्रमुख लक्षणे म्हणजे ताप, सर्दी, खोकला, कफ, अंगदुखी, खूप थकवा आणि जुलाब आहेत. लक्षणे दिसून येताच डॉक्टर तातडीने टेस्ट करण्यास सांगतात. करोना संसर्ग झालाय की नाही, हे तपासण्यासाठी टेस्ट हा खात्रीशीर पर्याय आहे. करोना संसर्ग झालाय का नाही हे शोधण्यासाठी दोन प्रकारच्या टेस्ट केल्या जातात.
आरटी पीसीआर आणि अँटिजेन या त्या दोन टेस्ट आहेत. ताप, सर्दी, खोकला, अंगदुखी यांसारखी लक्षणं असूनही कोव्हिड रिपोर्ट निगेटिव्ह येण्याची चार प्रमुख कारणं आहेत.
- स्वॅब घेण्यात झालेली चूक
2.व्हायरसला जिवंत राहण्यासाठी द्रवपदार्थ योग्य प्रमाणात वापरण्यात आला नाही तर - स्वॅबच्या नमुन्यांची योग्य वाहतूक न झाल्यामुळे
काही रुग्णांमध्ये व्हायरल लोड (शरीरातील व्हायरसची संख्या) फार कमी असते. त्यामुळे सर्व लक्षणे असूनही “टेस्ट फॉल्स निगेटिव्ह’ येण्याची शक्यता असते. “कोव्हिड-19 रायबोन्यूक्लिक ऍसिड प्रकारचा व्हायरस आहे. हा फार नाजूक आणि लवकर खराब होण्याची शक्यता असते. यासाठी कोल्डचेन योग्य असणे आवश्यक आहे. स्वॅबची वाहतूक करताना, व्हायरस सामान्य तापमानात राहिला तर खराब होतो. त्यामुळे लक्षणे असूनही टेस्ट रिपोर्ट पॉझिटिव्ह येत नाहीत.
पाणी प्यायल्याने किंवा खाल्ल्याने टेस्टवर फरक पडतो?
“कोव्हिड-19 टेस्ट करण्याआधी रुग्णाने पाणी प्यायले किंवा काही खाल्लं असेल तर याचा परिणाम पीसीआर टेस्टवर होण्याची शक्यता असते. यामुळे पॉझिटिव्ह रिपोर्ट निगेटिव्ह येण्याची शक्यता असते. शरीरातील हे घटक टेस्टला अडथळा निर्माण करतात. त्यामुळे टेस्टचे योग्य परिणाम मिळत नाहीत.
केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने म्हटले आहे की, म्युटेशन झालेला व्हायरसही आरटी पीसीआर टेस्टमधून निसटण्याची शक्यता कमी असते. भारतात वापरले जाणारे टेस्ट किट दोन “जीन’ शोधण्यासाठी बनवले आहेत. त्यामुळे व्हायरसमध्ये म्युटेशन झाले तरी टेस्टमधून व्हायरस सुटणार नाही. टेस्टची अचूकता आणि विशिष्टता आधीसारखीच आहे.
लक्षणे असून टेस्ट निगेटिव्ह आली तर काय करावं?
लक्षणं असूनही टेस्ट निगेटिव्ह आली आणि लक्षणं कायम असतील तर रुग्णांनी पहिली चाचणी केल्यानंतर 5 ते 6 दिवसांनी पुन्हा टेस्ट करून घ्यावी. तसेच वैद्यकीय सल्ल्याने उपचार सुरू करावेत आणि त्यानंतर पुन्हा टेस्ट करून घ्यावी. टेस्ट निगेटिव्ह असेल तर सीटी स्कॅन खूप महत्त्वाचे आहे.
फॉल्स पॉझिटिव्ह म्हणजे काय?
सूक्ष्मजीवतज्ज्ञ सांगतात, एखाद्या व्यक्तीच्या शरीरात व्हायरस नसले तरी त्याची टेस्ट पॉझिटिव्ह येऊ शकते. याला “फॉल्स पॉझिटिव्ह’ असं म्हणतात. करोनामुक्त झालेल्या व्यक्तीची टेस्ट पॉझिटिव्ह येऊ शकते. कारण, त्या व्यक्तीच्या शरीरात मृत करोना व्हायरस असू शकतो. करोनामुक्त झाल्यानंतर एक महिनाभर टेस्ट पॉझिटिव्ह येऊ शकते.
देशात कोव्हिड-19 चा डबल म्युटंट आढळून आलाय. करोना संसर्ग पसरण्यामागे डबल म्युटंट कारणीभूत आहे. शरीरातील रोगप्रतिकारशक्ती या डबल म्युटंटला ओळखू शकत नाही. त्यामुळे संसर्ग झपाट्याने पसरतोय. हा डबल म्युटंट टेस्टमधून निसटण्याची शक्यता आहे. व्हायरस लवकर म्युटेट होतात. टेस्टमध्ये जो भाग आपण तपासणार आहोत. त्यात बदल झाला तर परिणाम वेगळे येतात. म्युटेशनसाठी सरकारकडून टेस्ट किटमध्ये बदल करून घेण्यात येत आहेत.