पेट्रोल-डिझेल जीएसटीच्या कक्षेत येणार ? अर्थ राज्यमंत्री ठाकूर म्हणाले…

नवी दिल्ली – देशातील अनेक भागात पेट्रोल आणि डिझेलच्या दराने शंभरी पार केली आहे. त्यामुळे सर्वसामान्यांचे बजेट कोलमडलं आहे. इंधनावर केंद्र सरकारने लावलेल्या भरमसाठ करामुळे दरवाढ झाल्याचा दावा विरोधकांकडून करण्यात येत आहे. त्यावर सरकारकडून आंतरराष्ट्रीय बाजारात दर वाढल्याचे सांगण्यात येतं. मात्र आता पेट्रोल-डिझेलला जीएसटी अर्थात गुड्स अँड सर्व्हिस टॅक्सच्या कक्षेत आणण्यासंदर्भात चर्चा झाली.

लोकसभेत आणि राज्यसभेत आज इंधन दरवाढीवरून विरोधकांनी गदारोळ केला. त्यामुळे अनेकदा संसदेचं कामकाज स्थगित करण्यात आलं होतं. यावेळी विरोधकांनी पेट्रोल आणि डिझेलला जीएसटीच्या कक्षेत का आणलं जात नाही, असा प्रश्न उपस्थित केला आहे. यावर देशाचे अर्थ राज्यमंत्री अनुराग ठाकूर यांनी प्रत्युत्तर दिलं.


मंत्री अनुराग ठाकूर म्हणाले की, पेट्रोल आणि डिझेलला जीएसटीच्या कक्षेत आणण्यासाठी आतापर्यंत शिफारस करण्यात आलेली नाही. पेट्रोल-ड़िझेलचा जीएसटीच्या कक्षेत अंतर्भाव करण्यासाठी जीएसटी परिषदेची शिफारस आवश्यक असल्याचं अनुराग ठाकूर यांनी नमूद केलं.

 

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.